Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

यवतमाळ आयडलचे थाटात उद्घाटन

यवतमाळ,  प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्...


यवतमाळ,
 प्रतिनिधी :
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “यवतमाळ आयडल” या विदर्भस्तरीय संगीत स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. संविधान चौक येथील लॉर्ड बुद्धा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाने सांस्कृतिक वातावरणाला एक वेगळीच रंगत दिली.
ही स्पर्धा दिनांक ९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली असून विदर्भातील विविध भागातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत आहेत. उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान समता पर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण थूल यांनी भूषविले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोदिनी रामटेके, उमेश मेश्राम, अ‍ॅड. रामदास राऊत, माधुरी वाळके, हेमंत कुमार कांबळे, धर्मपाल भितकर, काजल तायडे, प्रा. विजय डोंगरे, बळीराम अडागळे, रवी बावनगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्पर्धकांना प्रोत्साहन देत संगीत क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले.
या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांचे परीक्षण धीरेंद्र गावंडे (कारंजा लाड) व संगीत तज्ञ शीला गायकवाड यांनी अत्यंत बारकाईने केले. स्पर्धकांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. विजय डोंगरे, प्रतिभा दातार, रीना वानखडे, हर्षाली बोडके व शुभम वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे उद्घाटन सोहळा अत्यंत सुरळीत व यशस्वीपणे पार पडला.
यवतमाळ आयडलच्या माध्यमातून नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध होत असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आगामी दिवसांत स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांमध्ये अधिक रंगत येणार असल्याची उत्सुकता संगीतप्रेमींमध्ये पाहायला मिळत आहे.

No comments