Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

प्रमोदिनी रामटेके यांना ‘सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार’ जाहीर

सामाजिक बांधिलकी व लढाऊ कार्याची दखल  प्रतिनिधी यवतमाळ  समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक पर...


सामाजिक बांधिलकी व लढाऊ कार्याची दखल
 प्रतिनिधी
यवतमाळ 
समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवणाऱ्या प्रमोदिनी रामटेके यांना यंदाचा ‘सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याची, निडर भूमिकेची व परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय सहभागाची दखल म्हणून हा पुरस्कार अनंत  या अट्रावालकर , दिनेश गंधे, डॉ.विजय कावळकर, प्रा . घनश्याम दरणे प्रदान करण्यात येणार आहे.
 प्रमोदिनी रामटेके यांनी आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात केवळ पद किंवा प्रतिष्ठा यापेक्षा समाजहिताला सर्वोच्च स्थान दिले आहे. समुदायातील सर्व घटकांना न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न शासनदरबारी पोहोचावेत आणि अन्यायाविरोधात ठामपणे आवाज उठवावा, या भूमिकेतून त्यांनी सातत्याने कार्य केले आहे. अन्याय कुणावरही झाला तरी तो त्यांना अस्वस्थ करतो आणि त्याच भावनेतून अन्यायग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्यांची भूमिका समाजाला दिशा देणारी ठरली आहे.
लढाऊ बाणा, निडर वृत्ती आणि जनसामान्यांप्रती असलेली आस्था या गुणांमुळे प्रमोदिनी रामटेके या केवळ लोकप्रतिनिधी न राहता परिवर्तनवादी चळवळीतील एक प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महिलांचे प्रश्न, सामाजिक समता, न्याय आणि लोकशाही मूल्यांची जपणूक यासाठी त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका मांडली आहे.
त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन ‘सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान आयोजित करण्यात आला असून, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, नवी इमारत, पिंपळगाव परिसर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी  प्रमोदिनी रामटेके यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व परिवर्तनवादी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. हा पुरस्कार समाजकार्याच्या क्षेत्रातील प्रेरणादायी कार्याला मिळालेली योग्य दाद असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

No comments