Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

राळेगावात इनोव्हा गाडीतून सुरू आहे गोस्करीचा गोरखधंदा — प्रशासन गाढ झोपेत!

पब्लिक पोस्ट  राळेगाव राळेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर गोतस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही तस्करी Innov...


पब्लिक पोस्ट 
राळेगाव

राळेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर गोतस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ही तस्करी Innova कारमधून केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील बहाळे ले-आऊट परिसरातून काल रात्रीच्या सुमारास गायींची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. गोप्रेमींना जराशीही भनक न लागू देता ही गाडी संशयास्पदरीत्या परिसरातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना, झोपून असलेल्या एका जागरूक ऑपरेटरला संशय येताच त्याने त्वरित मोबाईलवर हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद केला.संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो पाहिल्यानंतर अनेकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून गोवंशाची तस्करी केली जात आहे. परिसरातील नागरिकांचा आरोप आहे की हा प्रकार नवा नसून, अनेक दिवसांपासून राळेगावातून अशा प्रकारे गुपचूप गोतस्करी सुरू आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, याआधीही अशा प्रकाराबाबत प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ ठराविक वेळेस देखरेख करून, नंतर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. त्यामुळे “ही तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा सवाल आज उपस्थित होत आहे.
गोसंवर्धन करणाऱ्या संघटना, गोशाळा संचालक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी  करणार आहे. तसेच संबंधित वाहनाचा क्रमांक शोधून चालक व मालकावर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.
आता पाहायचे असे की, राळेगाव प्रशासन या गंभीर गुन्ह्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींना अटक करणार का?

No comments