Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

वारसदारां'ना मुकुट, निष्ठावानांना 'झटका'! यवतमाळात भाजप-काँग्रेसमध्येही 'घराणेशाही'चे अभिसरण

' यवतमाळ,  विजय मालखेडे  9075890895   यवतमाळच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने आता एक वेगळा आणि गंभीर राजकीय पेच निर्माण केला आहे. देशाती...

'

यवतमाळ, 
विजय मालखेडे 
9075890895
 
यवतमाळच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीने आता एक वेगळा आणि गंभीर राजकीय पेच निर्माण केला आहे. देशातील दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी (BJP), यांनी पुन्हा एकदा निष्ठा आणि कष्टाऐवजी 'वारसा' आणि 'घराणेशाही' लाच प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सुनेला उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे भाजपने विद्यमान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या कन्येला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. या दोन महत्त्वाच्या उमेदवाऱ्यांमुळे दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनात मोठा असंतोष खदखदत आहे.
 निष्ठावानांच्या गोटात 'खलबत्त' आणि वेदना ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे हृदय या निर्णयाने दुखावले आहे. पक्षाने दिलेले प्रत्येक ध्येयधोरण, प्रत्येक सूचना, प्रत्येक काम त्यांनी निष्ठेने आणि निःस्वार्थपणे पार पाडले. संघटना मजबूत करण्यासाठी, पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी जिथे गरज पडेल तिथे स्वतःला झोकून दिले.
कार्यकर्त्यांच्या ज्येष्ठ फळीतील बैठकांमध्ये सध्या तीव्र नाराजी आणि खलबत्त सुरू आहेत. त्यांचे म्हणणे आहे की कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद "आम्ही राबराब राबून पक्षाला मोठे केले. पक्षाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आम्ही केली. मग आम्हाला या कष्टाचे फळ म्हणून केवळ 'सतरंज्या उचलणे' आणि 'झेंडा धरणे' एवढेच का? आम्हाला 'राजेशाही' विरुद्ध 'लोकशाही' या लढ्यात नेहमीच उपेक्षित का ठेवले जाते? हा निर्णय आमच्या निष्ठेवर केलेला अन्याय आहे, आम्हाला असे फळ मिळणे अत्यंत चुकीचे आहे."
निष्ठावान कार्यकर्त्यांची स्वप्ने पूर्णपणे तुटली आहेत. त्यांना वाटते की, राष्ट्रीय पक्षांनीही जर निवडणुकीच्या रिंगणात कुटुंबातील व्यक्तींनाच उतरवायचे ठरवले, तर पक्षनिष्ठा आणि जनसंपर्क या मूल्यांना आता राजकारणात काहीच किंमत राहिली नाही.
लोकशाहीतील 'राजघराणी' आणि सामान्य कार्यकर्ते
हा संघर्ष केवळ यवतमाळमधील नगराध्यक्षपदापुरता मर्यादित नाही; तो भारतीय लोकशाहीत खोलवर रुजलेल्या घराणेशाहीच्या वृत्तीवर थेट बोट ठेवतो.ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला बळ दिले, त्यांना संधी नाकारणे.केवळ राजकीय वारसा आहे म्हणून उमेदवारी देणे.
हा दुटप्पी व्यवहार राजकारणाचे स्वरूप पूर्णपणे 'राजेशाही' बनवत आहे. जोपर्यंत 'घराणेशाही' हा 'मेरिट' (पात्रता) पेक्षा मोठा घटक राहील, तोपर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणे शक्य नाही.
या घराणेशाहीच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले निष्ठावान कार्यकर्ते आगामी निवडणुकीत काय भूमिका घेण्याची शक्यता आहे, येणारा ४ डिसेंबर चा काळच सांगेल.

No comments