प्रतिनिधी : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्याला हुलकावणी म...
प्रतिनिधी :
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतीय शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा यवतमाळ जिल्ह्याला हुलकावणी मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या अनेक दशकांपासून जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी अथक प्रयत्न करूनही अधिकृत उमेदवारीचे स्वप्न वारंवार दुरावल्याने शिक्षक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
" ऐतिहासिक धावत्या स्पर्धेचा आढावा1984 ते 1990 या काळात बाबासाहेब सोमवंशी यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तसेच अमरावतीचे आमदार म्हणून काम पाहिले.1990 ते 1996 मालदुरे सर यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अमरावतीमध्ये नेतृत्व केले."
1996 ते 2002 दिवाकरराव पांडे यांनी शिक्षक परिषदेचे एक टर्म आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.2002 मध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव खोतरे हे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले.2008 मध्ये संघटनेने अध्यक्षांना तिकीट नाकारून श्रावण बर्डे यांना उमेदवारी दिली; मात्र अधिकृत उमेदवार पराभूत झाले आणि वसंतराव खोतरे पुन्हा विजयी ठरले.
यवतमाळचे प्रतिनिधित्व – आशा आणि अपूर्णता
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक नेत्यांनी अनेक वेळा उमेदवारीची मागणी केली, परंतु ती प्रत्यक्षात मिळत नाही हे इतिहासावरून स्पष्ट होते.1996 मध्ये पी.के. टोंगे यांनी उमेदवारीची मागणी केली होती, परंतु त्यांनाही तिकीट मिळाले नाही.2020 मध्ये संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी जोरदार पाठपुरावा करून अधिकृत उमेदवारी मागितली होती. यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच प्रत्यक्ष प्रतिनिधित्व मिळण्याची चिन्गारी निर्माण झाली होती.परंतु मतमोजणीतील फक्त एका मताने देशमुख यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि अमरावतीचे प्रकाश काळबांडे यांच्या नावावर मोहर उमटली.
काळबांडे यांना या निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
2020 नंतरचा संघर्ष – अपेक्षा, विश्वास आणि पुन्हा निराशा
2020 नंतरही यवतमाळ जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी अरविंद देशमुख यांनी सातत्याने प्रयत्न केले.
जिल्हाभर तसेच अमरावती विभागात त्यांचा दांडगा संपर्क व संघटनेचे अध्यक्षपद त्यांच्या जवळ असल्याने, यवतमाळला अधिकृत तिकीट मिळण्याच्या आशा पुन्हा प्रबळ झाल्या.
परंतु आणि यंदाही ‘हुलकावणी’…
या वर्षीच्या निवड प्रक्रियेत पुन्हा एकदा
यवतमाळच्या आशांवर विरजण पडले.
प्रांतीय मतदारांनी अमरावतीचे दिलीप कडू यांच्या बाजूने मतदान केल्याने यंदाची अधिकृत उमेदवारीही यवतमाळच्या हातून निसटली.जिल्ह्यातील शिक्षक व कार्यकर्त्यांमध्ये आता स्पष्ट चर्चा सुरू आहे की —विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का?
यवतमाळची नाराजी उफाळली
गेल्या तीन दशकांत एकदाही अधिकृत उमेदवार न मिळाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.अनेकांच्या मते, अरविंद देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारानंतरही यंदा उमेदवारी दिली गेली नाही, हे जिल्ह्याच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे.संघटनेने पुढील निवडणुकांमध्ये यवतमाळला न्याय देण्याचे नवे संकेत दिले जातील का?की हा अन्यायाचा क्रम पुढेही असाच सुरू राहणार? याकडे संपूर्ण विदर्भातील शिक्षक समुदायाचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ जिल्ह्याला विदर्भ माध्यमिक संघाने उमेदवारी नाकारल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर पसरला असून अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर केली जाते का हा प्रति प्रश्न निर्माण केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षकांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या माणसाला जर उमेदवारी दिली तर शिक्षकांमध्ये उत्साहाची वातावरण राहते अन्यथा गत निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचे संकेत सध्या शिक्षक वर्गामध्ये दिसून येत आहे.
"पुन्हा दिवाळीच्या दिवशी पैठणीची पर्वणी"
#################################
शिक्षक मतदार संघामध्ये उमेदवारी दाखल केल्यानंतर पुन्हा दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी पैठणीची परभणी वाटण्याची खैरात सध्या यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा पाहायला मिळाली त्यामुळे शिक्षक मतदार संघामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार हा सुज्ञ आणि जागरूक आहे ही प्रक्रिया खोडून काढण्याचे षडयंत्र सुद्धा आखले जात आहे. त्यामुळे आता सुज्ञ मतदार कोणाल म्हणावे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून पर्यंत उमेदवार कोण याबाबतची कुठल्याही प्रकारची दिशा ठरविली गेली नसली तरी खरात वाटणे मात्र सर्रास सुरू झाल्याने आता शेवटी शिक्षकांचा आमदार कोण होईल हा प्रश्नच ऐरणीवर आलेला आहे.
No comments