Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

शिकलेली रणरागिणी तेजस्विनी मैदानात

महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत चालली असून ोठमोठ्या पुढार्‍यांच्या सभा आता यवतमाळच्या मैदाना...




महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये दिवसेंदिवस रंगत चढत चालली असून ोठमोठ्या पुढार्‍यांच्या सभा आता यवतमाळच्या मैदानामध्ये होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर ठेवून नुकतंच शिवसैनिकांचे प्रशिक्षण शिबिर एक दिवसाचं यवतमाळ येथे भव्य आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण युतीमध्येच लढून निवडणुका जिंकायच्या असा त्यांनी चंग बांधला. दुसरीकडे अतिशय संत गतीने परंतु नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय जनता पार्टीची बांधणी यवतमाळ शहर सोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लढवायच्या याबाबतची आखणी केली जात आहे. विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी देता कामा नये असा सूर जरी महायुतीत दिसून येत असला तरी यवतमाळ जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघता यवतमाळ जिल्ह्यामध्ये कधी भूतो न भविष्यती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होत असल्याने विरोधकांमध्ये धडकी भरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहेत.

"आदिवासीची रणरागिणी तेजस्विनी मैदानात उतरण्याची तयारी सध्या सुरू झाली असून यवतमाळ शहरांमध्ये ना भूतो न भविष्यती राजू चांदेकर नामक युवकाने दीड लाख आदिवासी लोकांच्या मोर्चाचे भव्य आयोजन केले होते त्यामुळे आदिवासींच्या हक्कासाठी गेल्या 30 वर्षापासून लढत असणाऱ्या या युवकाची मुलगी प्राध्यापक तेजस्विनी यावेळी यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रण मैदानात उतरणार असून आता युवा चेहऱ्यांना संधी मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे."
विशेष म्हणजे यवतमाळ येथील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत वंचित बहुजन आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या पूर्ण आटोपल्या असून शेवटच्या स्तरांमध्ये आता या आघाडीमध्ये जर वंचित ची एन्ट्री झाली तर निवडणूक मात्र रंगतदार होण्याचे चित्र दिसून येत आहे. 
यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होता आज मात्र काँग्रेसला यवतमाळ जिल्ह्यामध्ये घरघर लागलेली आहे. काँग्रेसला यवतमाळ जिल्ह्यामध्ये लागलेली ही घरघर कुणामुळे लागली ही कोणत्याही कार्यकर्त्याला व मतदाराला सांगण्याची गरज नाही अलीकडच्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची बांधणी केली नसून जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यात कुठेही काँग्रेसच्या शाखेचे बोर्ड सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येत नाही. एकीकडे राष्ट्रीय पातळीवरील नेते राहुल गांधी जीवाचे रान करून काँग्रेसचे संघटन बांधण्यासाठी झटत असताना दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ निर्माण झाल्याचे दिसून येते. हाय फाय नेत्यांच्या पदांचा सिलसिला लक्षात घेता जमिनीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नशिबी मात्र शेवटी सतरंज्या उचलण्याचेच कार्य येत असल्याने आता बहुतांशी काँग्रेसमध्ये असणारा वर्ग हा इतर पक्षांमध्ये जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकेकाळी वैभव संपन्न असणाऱ्या काँग्रेसमध्ये एवढी अवकळाकाली याचे चिंतन अनेकदा वरिष्ठ पातळीवर केले असतानाही देश पातळीवर राज्य पातळीवर काम करणाऱ्या सेकंड फळीतील कार्यकर्त्यांच्या कुठल्याही भावना ऐकल्या जात नसल्याने आता मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर मात्र काँग्रेस कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 
यवतमाळ जिल्ह्यातील नेते काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून परिचित आहेत अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसचे नेतृत्व एडवोकेट शिवाजीराव मोघे यांच्याकडे काँग्रेसने काही कार्ड दिले होते महाराष्ट्रामध्ये असणारा आदिवासी समुदाय काँग्रेसकडे जोडल्या जावा अशा प्रकारचा काँग्रेसचा मनसुबा होता परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक न पडल्याने शेवटी त्यांना त्या पदावरून पाय उतार करून दुसऱ्याकडे राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली.दुसरीकडे महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्षाचं पद यवतमाळला मिळालेला आहे या पदावरती संध्या सव्वालाखे यांची वर्णी लागली आहेत. या निवडीबद्दल यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुरकर यांनी उघड काँग्रेसला पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती अशी असतानाही वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता परत त्यांना अध्यक्ष पद बहाल केले परंतु जरी राज्यस्तरावरती कार्य असलं तरी जमिनीवर मात्र काँग्रेसचे कुठल्याही प्रकारचे कार्य दिसून येत नसल्याने शेवटी आता हाय फाय नेत्यांच्याच पंक्तीत काँग्रेस बसेल का? हा प्रति प्रश्न निर्माण झालेला आहे. अखिल भारतीय काँग्रेस च्या राष्ट्रीय स्तरावरील 16 सभासदांच्या यादीमध्ये माणिकराव ठाकरे यांचे नाव आहे परंतु मतदार संघामध्ये झालेला पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनीही आता काँग्रेसचे संघटन बांधण्याच्या दृष्टिकोनातून काय पाऊल्य उचललेत याकडे सुद्धा आता चिंतनाचा आणि मनाचा विषय प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेला आहे. एकेकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद माणिकराव ठाकरे यांच्याकडे असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेसची शाखा निर्माण करण्यामध्ये व युवक काँग्रेसचे नेटवर्क बनवण्यामध्ये माणिकरावांनी हातखंडा निर्माण केला होता त्यानंतर मात्र आता काँग्रेसचा कुठेही बोलबाला दिसत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपले राजकीय करिअर घडवण्यासाठी दुसऱ्या पक्षाकडे मोर्चा वाढवण्याचे दिसून येते. 
वंचित आणि काँग्रेसची युती झाल्यास यवतमाळ नगरपरिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकेल 
वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्षांसोबत जर युती झाली तर यवतमाळ नगर परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी व प्रभागातील रचना लक्षात घेता महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारचे यश संपादन होण्याचे चित्र निर्माण झाले असून यामध्ये कुठल्याही प्रकारची मताची विभागणी होणार नसल्याने यवतमाळ नगर परिषदेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकण्याचे संकेत सध्या एकूण चर्चेवरून दिसून येत आहेत. पण दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा कंबर कसली असून कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुती सत्तेमध्ये आणायची असा चंग बांधल्या जात आहे. 
काँग्रेसची समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू. 
वंचित बहुजन आघाडी व इतर घटकांसोबत काँग्रेसची जरी बोलणी सुरू असली तरी वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरती आपण निर्णय घ्या असा आदेश एडवोकेट प्रकाश आंबेडकरांनी दिला असल्याची चर्चा सध्या सुरू असून जर वंचित बहुजन आघाडीने युती केली तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये यवतमाळ जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेचे चित्र बदलण्याचे संकेत सुद्धा दिसून येत आहे. 

पालकमंत्र्याच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक 
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नेर दारव्हा दिग्रस सह जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवड आणण्याच्या बद्दलचे रणनीती आखल्या गेली असून त्याचेच परिणाम काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम घेऊन जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एकवटून आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवायचाच असा चंग त्यांनी बांधलेला आहे. इतर पुढार्‍यांच्या तुलनेमध्ये नामदार संजय राठोड यांच्या काम करण्याची कार्यशैली काही वेगळ्या प्रकारची असून प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कदर करणारे पालकमंत्री असल्याने अनेक युवकांनी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळे भगवा झेंडा कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपरिषदेमध्ये फडकून दाखवायचा अशा प्रकारचा चंग सध्या बांधला गेला असून सर्व शिवसैनिक आता कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. 

.

No comments