Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

उमरखेड एमआयडिसीत सबस्टेशन मंजूर

प्रतिनिधी  उमरखेड : उमरखेड शहराला काहिदिवसा अगोदरच 10 MVA चे दोन रोहित्र मिळाले होते त्यापाठोपाठ आता स्थानिक एमआयडिसी साठी सबस्ट...



प्रतिनिधी 
उमरखेड :
उमरखेड शहराला काहिदिवसा अगोदरच 10 MVA चे दोन रोहित्र मिळाले होते त्यापाठोपाठ आता स्थानिक एमआयडिसी साठी सबस्टेशन मंजूर झाले असून ४ कोटी रुपयाचे शहरात विविध प्रभागात २७ ट्रान्सफार्मरला प्रशासकिय मान्यता मिळाल्याने येत्या काळात उमरखेड शहराची विज समस्या जवळपास निकाली निघण्याची शक्यता असून यासाठी पाठपुरावा करणारे आ  वानखेडे व भाजपा नेते नितिन भुतडा यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे .
येथील एमआयडिसी मध्ये बरेचसे उद्योग , लघू कारखाने असून त्यांना विजेअभावी त्रस्त व्हावे लागत होते. अनेक वर्षापासूनची त्यांची मागणी अखेर आ. वानखेडे नितिन भुतडा यांच्या सरकारकडे केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे सबस्टेशनला मंजूरात मिळाली आहे. या होणाऱ्या सबस्टेशनचा फायदा एमआयडिसी सोबतच परिसरातील शेतकऱ्यांनाही होणार आहे . उमरखेड शहराचा विचार केला तर शहरात अतिरिक्त लोड हा उपलब्ध असलेल्या सध्याच्या तिन ठिकाणच्या स्टेशनवर पडून अनेकवेळा लोड सहन न झाल्याने ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रकार घडत होते. आता शहरातील सबस्टेशन येथे २  ट्रॉन्सफार्मर,आंबेडकर पुतळा, जामा मस्जिद, पत्तेवार, रहिम नगर कब्रिस्तान , कमेला नगर, चरडे नगर, ताज मस्जिद, शाह कॉलनी , व्दारका नगर , नाग चौक, नाथनगर, फतेमा कॉलनी, बाळू पाटील नगर , बुद्ध विहार , बैल बाजार, भंडारी ऑईल मिल , यादव नगर, रहिम नगर कॉलनी, राम मंदीर, रामकृष्ण कॉलनी , रेणुका नगर, शिवाजी वार्ड, श्रद्धा नगर, संजोग भवन ,जुना कोर्ट एरिया , साई श्रद्धा नगर या २७ ठिकाणावर ट्रान्सफार्मर बसविण्याची प्रशासकिय मान्यता मिळाली आहे . हे २७ ठिकाण संपूर्ण शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील असल्याने हे ट्रान्सफॉर्मर बसल्यानंतर शहरातील विज समस्येवर निश्चितच मात होणार असल्याने नागरिकांना विजेचा त्रास होणार नाही आहे. विज समस्येबाबत आमदार किसन वानखेडे यांच्या सोबत भाजपा नेते नितिन भुतडा यांनी ऊर्जा राज्य मंत्र्याकडे,पालकमंत्री संजय राठोड व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे आग्रही भुमिका मांडल्यानेच शहरातील २७ ठिकाणावर ट्रान्सफार्मर बसविण्याची मान्यता मिळाली असल्याने अनेकांनी त्यांचे स्वागत केले आहे .

"शहरातील विज समस्येबाबत तोडगा काढण्याचा पर्याय काय ? याविषयावर आ  वानखेडे साहेब व विकासाची दुरदुष्टी ठेवणारे नितिन भुतडा यांना शहरातील सर्वे करून त्यांना रोहित्र व ट्रान्सफार्मर हवे आहे असे सांगीतले होते. त्यांच्या प्रयत्नामुळे एमआयडिसी ला स्वतंत्र सबस्टेशन मंजूर झाले तर शहरात २७ ठिकाणी ट्रान्सफार्मरची व्यवस्था होणार असल्याने शहराची ७५ टक्के समस्या निकाली निघाली असून शहर हे शंभर टक्के विज समस्यामुक्त करण्यासाठी आ. वानखेडे व भाजपा नेते नितिन भुतडा यांचेकडे मागणी निश्चित करणार आहे "
 प्रशांत अंबटकर

No comments