Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

सोयाबीन-कापूस होळी आंदोलन

यवतमाळ  शहर काँग्रेस,तालुका काँग्रेस आणि यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने आज दिनांक २४ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी यवतमाळ श...



यवतमाळ 
शहर काँग्रेस,तालुका काँग्रेस आणि यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने आज दिनांक २४ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी यवतमाळ शहरातील संविधान चौकात भव्य सोयाबीन-कापूस होळी आंदोलन पार पडले.
या आंदोलनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना आवाज दिला.
दरम्यान शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी “नाफेडची खरेदी केंद्रे सुरू झालीच पाहिजेत!”“सीसीआयची खरेदी केंद्रे सुरू झालीच पाहिजेत!”“सातबारा कोरा झालाच पाहिजे!” अशा घोषणा देत केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवीला.
प्रमुख उपस्थित प्रदेश सचिव जावेद अंसारी, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसणकर, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी ढोक,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जाफर खान,सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, शेतकरी चळवळीचे सहकारी कॉम्रेड सचिन मनवर,युवक काँग्रेसचे कळंब तालुकाध्यक्ष पवन जाधव,शेतकरी चळवळीचे शेतकरी आंदोलक प्रा.पंढरी पाठे, ऍड.सीमा तेलंगे,अशोक भुतडा, बाळू निवल, मुज़फर् पटेल, बबली भाई, अहमद शाह, मोहसिन खान, मोहम्मद् नईम, राजिक पटेल, अज़मत खान, फैसल पटेल तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments