Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

ढाणकी शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन

पब्लिक पोस्ट प्रवीण जोशी (ढाणकी) शहरात होत असलेल्या गणेश उत्सव व ईद या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही ...


पब्लिक पोस्ट
प्रवीण जोशी
(ढाणकी)
शहरात होत असलेल्या गणेश उत्सव व ईद या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी बिटरगाव ( बु) पोलीस प्रशासनाकडून  शहरात शांतता काय ठेवण्यासाठी दि २ सप्टेंबर रोजी रूट मार्च काढून शहरातील जनतेला व नागरीकांना  कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेश उत्सव व  ईद  निमित्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता व उमरखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर रोजी बिटरगाव (बु) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांचे उपस्थितीत शहरातील मुख्य मिरवणूक रस्त्याने रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना धार्मिक सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत सण साजरे करण्याचे आव्हान शहरातील नागरिकांना केले आहे. यावेळी सपोऊनि अन्नमवार,सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments