यवतमाळ, दि.११ ऑगस्ट.. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्...
यवतमाळ,
दि.११ ऑगस्ट..
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज यवतमाळ शहरातील संविधान चौकात तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन व सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
दि. ११ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली असून, ही कारवाई अलोकशाही, बदलेखोर व दडपशाहीची असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दडपण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलनकर्त्यांनी संविधान रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगितले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात राहुल गांधी व अन्य नेत्यांवरील अटक तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना लोकशाही पद्धतीने चर्चेतून उत्तर देण्याची आणि भविष्यात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये याची हमी देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा जिल्हा व राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भीसनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, ऍड. सीमा तेलंगे, ऍड. जयसिंग चव्हाण, राजू वीरखेडे, कॉ. सचिन मनवर, विजय देवतळे, विक्की राऊत, राजू चांदेकर, जुबेर सय्यद, शुभम शेंडे, ऋषभ गुल्हाने, स्नेहल रेचे, छोटू सवाई, विशाल पावडे,सुरज बोढे, दत्ता हाडके, ओम तिवारी, असमत खान, जरार खान, गंगाधर राऊत, वासुदेव मानकर, अरविंद जाधव, अशोक पुसदकर, कैलास सुलभेवार, नईम पैलवान, किशोर गजभिये, मनोज पाचघरे, विजय मानेकर, शैलेश गुल्हाने आदींसह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments