दिनेश खांडेकर पब्लिक पोस्ट पुसद:दि.१७ जुलैच्या मध्यरात्री शेंबाळपिंपरी येथे शॉर्ट सर्किटमुळे गजानन राघोजी डाखोरे,कुंडलिक संभाजी...
दिनेश खांडेकर
पब्लिक पोस्ट
पुसद:दि.१७ जुलैच्या मध्यरात्री शेंबाळपिंपरी येथे शॉर्ट सर्किटमुळे गजानन राघोजी डाखोरे,कुंडलिक संभाजी तास्के,संतोष बळीराम कगळे,विजय संभाजी थोरात या टेलर कारागिरांची दुकाने भिषण आगीमुळे भस्मसात होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले होते. घटना समजताच १९ जुलै रोजी
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी तातडीने शेंबाळपिंपरी येथे जाऊन चारही दुकानदारांची भेट घेऊन नुकसानग्रस्त दुकानांची पाहणी केली.नुकसान ग्रस्त दुकाने पुन्हा उभी करण्यासाठी भारती मैंद पतसंस्थेकडुन कमी व्यादराने प्रत्येकी ५० हजार रुपयाचे कर्ज तात्काळ मिळवुन दिले. तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली या दोन्ही मदतीमुळे चारही व्यवसायिकांनी आपली दुकाने पुन्हा उभे केले ४ ऑगस्ट रोजी शरद मैंद यांना शेंबाळपिंपरी निमंत्रीत करून त्यांच्या हस्ते दुकानांचे उदघाटन करण्यात आले.यावेळी सरपंच रवींद्र महल्ले यांनी शरद मैंद यांच्या दातृत्वाही प्रशांसा करीत गरजुंना मदतीचा हात देणारे व्यक्तीमत्व असा उल्लेख केला. यावेळी शैलेश वाकडे,संग्राम देशमुख,मतीन पहेलवान,इम्रान खान, यशवंतराव चौधरी, प्रेमराव देशमुख,धुत काका,सुर्यवंशी,ललीत चव्हाण,नंदु देशमुख,जयश्री देशमुख,प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार व गावाती नेते फक्त मताचा जोगवा मागण्यासाठी येतात*
यावेळी नुकसान ग्रस्त दुकानदारांनी भावुक होत प्रतिक्रिया व्यक्त करतांना आगीत व्यावसायिकांची दुकाने भस्मसात झाली.परंतु स्थनिक आमदार,व त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक आली कि मतांचा जोगवा मागत विनवण्या करत फिरणारे गावातील दगडा खाली असलेल्या नेत्यांनी मदत तर दूर माणुसकीच्या नात्याने आम्हाला भेटही दिली नाही.परंतु शरद मैंद यांनी वेळेवर मदत करून आम्हाला पुन्हा आमचा व्यावसाय सुरु करण्यास मोलाचे सहकार्य केले असे भाऊक होऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
No comments