---------------------------------------- पब्लिक पोस्ट प्रतीनीधी- रमेश मादस्तवार घाटंजी - दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रामपूर शासकीय...
----------------------------------------
पब्लिक पोस्ट
प्रतीनीधी-
रमेश मादस्तवार
घाटंजी - दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रामपूर शासकीय आश्रम शाळेत रामपूर "जागतिक आदिवासी अस्मिता दिन" तथा "रक्षाबंधन" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी रामपूर गावात शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात येऊन क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके आणि वीरांगणा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थिनी द्वारा आकर्षक लेझीम नृत्य सादर करण्यात आले.
रामपूर आश्रम शाळेच्या बहुउद्देशीय सभागृहात "जागतिक आदिवासी अस्मिता दिन" तथा "रक्षाबंधन" ह्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कु. वसुंधरा वानखेडे मॅडम, कार्यक्रमाचे उद्घाटक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवानराव रामगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मोतीरामजी कन्नाके, रामपूर येथील सरपंच नरसिंगजी पेंदोर, पोलीस पाटील श्रीमती मंगला पाटील आणि राजेंद्र पाटील यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षक प्रवीण जैन सर यांनी आदिवासी संस्कृतीचे महत्व विशद करून निसर्गसंतुलनातील योगदानावर प्रकाश टाकला. माननीय मोतीरामजी कन्नाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापिका वानखेडे मॅडम यांनी विद्यार्थी तथा पालकांना शाळेतील नियमित उपस्थितीचे महत्व सांगितले. यावेळी आदिवासी समाजसेवक मोतीरामजी कन्नाके यांनी समाज विकासाकरिता दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी कु. आचल सिडाम, कुणाल पेंदोर यांनी मनोगत तर कु. सुरेखा धूर्वे, वैष्णवी तोडसाम, तेजस्विनी सिडाम, तृप्ती सिडाम, लक्ष्मी मरापे, माही मडावी, सारिका बोरकर, श्रेया ढोणे, वैष्णवी जुनघरे, चैतन्या कोटनाके, कल्पना अत्राम, रागिनी मेश्राम, आचल आत्राम, प्रगती न्याहारे इत्यादींनी आदिवासी सांस्कृतिक नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिक्षक प्रभाकर जाधव सर तर आभार प्रदर्शन शिक्षिका कु. अनिशा देशमुख मॅडम यांनी केले.
शिक्षक श्री निलेश गावंडे सर आणि कु.विना कांबळे स्त्री अधीक्षिका मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेऊन मानवी जीवनात बहिण - भावाच्या नात्याचे महत्त्व विशद केले गेले. ह्यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देखील देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र पारधी सर, संतोष जयस्वाल अधीक्षक, दिनेश आत्राम, यशवंत शेंडे, श्री रोहित कुडमते, आरोग्य सेविका कु. मीनाक्षी पेंदोर, श्रीमती दुर्गाबाई सिडाम, श्रीमती ज्योत्स्ना मंगाम, राजेश कुमरे, श्री वासुदेव गेडाम व रामसागर बेले यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सर्वांना मिष्ठांन भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments