*प्रतिनिधी दारव्हा* बहिणीच्या घरून परत येत असलेल्या महिलेच्या साधेपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन आळीपाळीने त्याचेवर सामूहिक अत्याचार केल्याच...
*प्रतिनिधी
दारव्हा*
बहिणीच्या घरून परत येत असलेल्या महिलेच्या साधेपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घेऊन आळीपाळीने त्याचेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.९ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ४ वाजेच्या दरम्यान तालुक्यातील बागवाडी येथील गजानन नगरी या लेआऊट मध्ये घडली आहे.मतिमंद महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार अत्याचार पीडित महिलेच्या बहिणीच्या जबानी रिपोर्टवरून उघडकीस आली आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार,पोलिस स्टेशन दारव्हा हद्दीतील बागवाडी येथील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादीची साधी व भोळसर बहीण ही दि ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास बागवाडी येथे फिर्यादीचे घरी गेली होती. पीडिता घरी परत जात असताना यातील एकूण ५ आरोपीतांनी तिच्यावर रात्री ९ ते सकाळी ४ वा चे दरम्यान पीडितेवर आळीपाळीने जोर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून संकेत रामू पवार वय २६,किशोर मधुकर सूर्यवंशी,सौरभ दादाराव कसारदार वय २९, रा सर्व बागवाडी व वेदांत गजानन पोकळे रा. कुंभारकिन्ही (पुनर्वसन) आणि एक विधी संघर्षग्रस्त अशा एकूण पाच आरोपीतांवर भारतीय न्याय संहिता अप. क्र. ५३३/२५ कलम ७०(१), ३(५) अन्वये सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपीना अटक करण्यात आली आहे. व पुढील तपास दारव्हा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारक करीत आहे.
No comments