Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

कोडपाखेंडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

पब्लिक पोस्ट झरीजामणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोडपाखेंडी येथे विनोद सिडाम व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने भव्य...



पब्लिक पोस्ट
झरीजामणी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोडपाखेंडी येथे विनोद सिडाम व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या पारंपरिक वाद्यांच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात झाली.
गावातील शासकीय नोकरीत रुजू झालेल्या युवक-युवतींचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच गावातील शिक्षण, खेळ व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात आदिवासी संस्कृती, परंपरा आणि हक्क यावर मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले. गावातील युवक युवतीनी पारंपरिक नृत्य व गीतांचे सादरीकरण करून वातावरण रंगविले. यावेळी सरपंच गंगाधर आत्राम, जी प शिक्षक अविनाश कुळमेथे, ए बी मोरे, विनोद सिडाम, सुरज मेश्राम, प्रशांत गेडाम, वाल्मिकी आत्राम, मदन गेडाम, गणेश कुळमेथे, दीपक सिडाम, जीवन येरमे,ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, महिला बचतगट सदस्य, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments