यवतमाळ नगर परिषदे ची बाजार दैनिक वसुली ठेकेदाराकडून करण्यात येते, नगरपरिषदेची दैनिक वसुलीची पावती 30 रुपये व 50 रुपयाची आहे, म...
यवतमाळ
नगर परिषदे ची बाजार दैनिक वसुली ठेकेदाराकडून करण्यात येते, नगरपरिषदेची दैनिक वसुलीची पावती 30 रुपये व 50 रुपयाची आहे, मात्र ठेकेदारांची माणसे दादागिरीने, कोणतीही पावती न देता 200 रुपये प्रति दुकान याप्रमाणे वसुली करीत होते, या संबंधित तक्रारी दत्त चौकातील राखी व्यवसायिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्याकडे मांडल्या, त्यावरून शिवसेनेने संबंधित सर्व व्यावसायिकांना घेऊन नगरपरिषदेला धडक दिली
मुख्याधिकाऱ्यांना जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ कल्पना दरवई, शहर प्रमुख विनोद पवार, चेतन शिरसाट यांचे नेतृत्वात निवेदन देऊन त्यांच्या कानावर संबंधित तक्रारीचा पाढा वाचला, संबंधित ठेकेदारांच्या माणसाने रजिस्टरवर व्यावसायिकांचे नावे लिहून घेतली, मोबाईल नंबर लिहून घेतला व 200 रुपये प्रति दुकान याप्रमाणे वसुली केल्याची तक्रार यावेळी दत्त चौक येथील व्यावसायिकांनी केली. संपूर्ण शहरांमध्ये याचप्रमाणे दादागिरी ने, शिवराळ भाषा वापरून वसुली केल्या जात असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी क्यातमवार यांनी चौकशीचे आदेश देऊन, बाजार विभाग प्रमुख हरीश जाधव यांना बोलावून राखी व्यावसायिकांच्या सोबत जाऊन संबंधित ठेकेदारांच्या माणसांना समज देण्यास सांगितले. शिवसेनेच्या दणक्याचा परिणाम काल संध्याकाळी ठेकेदाराच्या माणसाने निमूटपणे 50 रुपयाची पावती देऊन वसुली केली. नगरपरिषद बाजार अवैध वसुली संदर्भात शहरातील व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी संपर्क साधावा, नगरपरिषदेची रीतसर 30 रुपये किंवा 50 रुपये ची पावती घेऊनच पैसे द्यावे दादागिरीला बळी पडू नये असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले
निवेदन देते प्रसंगी व्यावसायिक धीरज शाहू, विवेक ढोले, अतुल जोमदे, शुभम सपकाळ, गजानन रोकडे, दिनेश गुप्ता, सुनील पांडे, विजय सपकाळ, रमेश यादव, ऋत्विक सूर्यवंशी, पंकज बत्रा, उमाकांत यादव, सतीश पंजवानी, प्रफुल तोष्णीवाल ,कृष्णा दासवानी, संतोष शेंडे, दिनेश इरवे, सचिन इरवे, नेहा मोरे ,चेतन मोरे ,रामभाऊ इरवे ,दुर्गाप्रसाद गुप्ता ,प्रकाश शाहू ,शेख मतीन, पाकीजा सादिक इत्यादी उपस्थित होते
No comments