यवतमाळ आज दि. 07/08/2025 रोजी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसा...
यवतमाळ
आज दि. 07/08/2025 रोजी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावरील हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे, सद्यस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर हुमणी अळीचे आक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर उध्वस्त झालेले आहे, शेतकऱ्यांसाठी निसर्गाचे हे संकट नवीनच असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या संकटाला कसे सामोरे जावे हा प्रश्न पडला आहे, उपाययोजना करण्यापूर्वीच या किडीने संपूर्ण सोयाबीनचे पीक फस्त केल्याचे काही ठिकाणी आढळून आलेले आहे, यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले, याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ कल्पना दरवई, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, संकेत ठाकरे,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र धोटे, विनोद काकडे ,बळीराम मुटकुळे, रवीपाल गंधे,जिल्हा संघटक डीबी मेश्राम,अल्पसंख्यांक जिल्हा संघटक काझी आसिफ अली, शेतकरी सेना जिल्हा संघटक गजानन पोटे, साजिद खान वाहतूक जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख नितीन माकोडे,गजानन पाटील, संतोष ठाकरे, सतीश नाईक, रवींद्र भारती, गजानन पांडे, शहर प्रमुख विनोद पवार, चेतन शिरसाट, राहुल देशपांडे, वैभव सुने,विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव, प्रशांत मस्के ,चंद्रशेखर केळतकर, मोहन विश्वकर्मा ,तेजस गावंडे, अमोल नरवाडे, सौ मंदा गुडदे ,सौ नंदा भिवगडे, रवींद्र काळे इत्यादी शिवसैनिक हजर होते.
प्रति,
संपादक/वार्ताहर
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करावी ही विनंती.
No comments