पब्लिक पोस्ट शेख इरफान नागपूर तुळजापूर महामार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरा येथील टोल नाक्यावर उमरखेड महागाव तालुक्यातील न...
पब्लिक पोस्ट
शेख इरफान
नागपूर तुळजापूर महामार्गावर महागाव तालुक्यातील बिजोरा येथील टोल नाक्यावर उमरखेड महागाव तालुक्यातील नागरीकांना टोल माफ करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आजाद समाज पक्षाच्या वतीने दिनांक 6 ऑगस्ट रोजी करण्यात आली,
उमरखेड व महागाव इथून यवतमाळ कडे जाणाऱ्या नागरिकांना दोन टोल नाक्यावर टोल भरावा लागत असल्याचे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे,
केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे राज्यात बहुतांश ठिकाणी टोल नाका असलेल्या ठिकाणा पासून वीस किलोमीटर अंतरावरील नागरिकांना तसेच पत्रकारांना टोल माफी आहे, महागाव तालुक्यातील बिजोरा येथील टोल नाका व्यवस्थापन या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसोबत अरेरावी,मुजोरी, करीत असल्याच्या अनेक तक्रारी सामोरं आल्या आहेत,
शासकीय आदेशाचे पालन न करणाऱ्या टोल नाका व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी,
उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना टोल नाक्यावर त्यांचे ओळखपत्र तपासून टोल माफी करण्यात यावी, त्यांना टोल मुक्त करण्यात यावे, टोल नाका व्यवस्थापनाणे 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात मागण्या मान्य न केल्यास, संबंधित टोल नाक्या समोर डफली बजाव आंदोलन छेडून रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा,
आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव,, जिल्हा उपाध्यक्ष आशिष खडसे, जिल्हा संघटक, बिलाल राज, उमरखेड युवा शहराध्यक्ष शेख असलम, तालुका महासचिव सचिन वाहुळे, विनोद बर्डे मुजीब लाला,, जाकीर काजी, दानिश शेख, अकिब खान, अबूजार बेग, परवेज खान, शहाबाज खान, सय्यद रमजान, जावेद कुरेश, शाकीर खान, अर्शद सौदागर, यांनी दिला आहे
No comments