Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

दोन सख्ख्या भावांनी केले एकाच मुली सोबत लग्न!

पब्लिक पोस्ट ब्युरो  हिमाचल प्रदेश  भारत हा विविध परंपरेने नटलेला देश आहे या देशांमध्ये ज्या भागांमध्ये वास्तव्य करणाऱ्या जाती आ...


पब्लिक पोस्ट ब्युरो 
हिमाचल प्रदेश 
भारत हा विविध परंपरेने नटलेला देश आहे या देशांमध्ये ज्या भागांमध्ये वास्तव्य करणाऱ्या जाती आणि जमाती आहेत त्यांची जीवन पद्धती काही वेगळी आहे. आजही त्या परंपरा तेवढ्याच नितीने आणि विश्वासाने ते पार पाडतात. हिमाचल प्रदेश मध्ये राहणाऱ्या छोट्याशा गावातील हाटी समुदायातील दोन सख्ख्या भावांनी एकाच मुली सोबत लग्न केल्याने संपूर्ण भारतामध्ये खडबड उडाली. समाज माध्यमांवरती यांना टोल सुद्धा करण्यात आलं परंतु न्यायमूर्ती रानडेच्या पुस्तकांमध्ये हिमाचल प्रदेश मध्ये असणाऱ्या विविध जाती परंपरेचा उल्लेख वाचल्यानंतर कुठल्याही प्रकारचं वाचन करणाऱ्या आणि हुशारीचा आवडणाऱ्या अनेक विद्वानांचा समाज माध्यमांवरती व्यक्त झालेल्या विचारांचा पर्दाफाश झाला.
हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात शिलाई गावात अलीकडेच एका अनोख्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिथे एका मुलीसोबत दोन भावांनी लग्न केले आहे. शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी यांनी कुनहाट गावच्या सुनीता चौहानसोबत लग्न केले आहे. हा विवाह एकमेकांच्या सहमतीने आणि सामुहिक पद्धतीने करण्यात आला. हा विवाह हाटी समुदायाच्या परंपरेनुसार करण्यात आला. ज्यात एकाच पत्नीला दोन किंवा अधिक भावांमध्ये शेअर केले जाते. ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, प्रदीप नेगी जलशक्ती विभागात कार्यरत आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ कपिल परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत आहे. जरी दोघांची जीवनशैली आणि देश वेगवेगळे असले तरी दोन्ही भावांनी मिळून ही परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला. प्रदीप म्हणाले की, हा आमचा संयुक्त निर्णय होता. हे विश्वास, काळजी आणि सामायिक जबाबदारीचे नाते आहे. आम्ही ही परंपरा उघडपणे स्वीकारली कारण आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान आहे. तर मी परदेशात असलो तरी या लग्नाद्वारे आम्ही माझ्या पत्नीला स्थिरता, आधार आणि प्रेम देण्यासाठी वचनबद्ध आहे असं कपिल नेगी यांनी म्हटलं. 
हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला ही परंपरा माहित आहे आणि मी ती माझ्या स्वेच्छेने स्वीकारली आहे असं नव्या नवरीने सांगितले.  या अनोख्या लग्नात शेकडो गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पारंपारिक ट्रान्स-गिरी पदार्थ बनवण्यात आले आणि डोंगराळ लोकगीतांवर नाचणाऱ्या गावकऱ्यांनी लग्नाला उत्सवाचे स्वरूप दिले. आमच्या गावातच तीन डझनहून अधिक कुटुंबांमध्ये दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी असते. परंतु असे विवाह सहसा शांतपणे होतात. हे लग्न प्रामाणिकपणे आणि सन्मानाने सार्वजनिकरित्या साजरे करण्यात आले, जे त्याला खास बनवतात असं स्थानिक लोक म्हणतात.
नवरी मुलीची प्रतिक्रिया 
कुठल्याही प्रकारचा दबाव न ठेवता मी माझ्या मर्जीने हा विवाह केलेला आहे विशेष म्हणजे माझ्यासोबत ज्यांनी विवाह केला त्यांची सुद्धा कुठल्याही प्रकारची हरकत नाही. भारतीय परंपरा जोपासण्याचे काम आम्ही करतोय समाज माध्यमांवरती काय येतंय यावरती आमचा विश्वास नाही परंतु आम्ही एकमेकांचे विश्वासू आहोत अशी प्रतिक्रिया तिने प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

No comments