यवतमाळ जांभवाडी (ता. जि. यवतमाळ) येथील बाबुशा तानबाजी काळोकार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील ओक...
यवतमाळ
जांभवाडी (ता. जि. यवतमाळ) येथील बाबुशा तानबाजी काळोकार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील ओकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी इम्युनोथेरपी ही अत्यावश्यक असल्याचे सांगितले. मात्र, या उपचारासाठी लागणारा सुमारे ८ लाख रुपयांचा खर्च अत्यंत गरीब आर्थिक परिस्थितीत असलेल्या काळोकार कुटुंबासाठी फारच कठीण होता. या अचानक ओढावलेल्या संकटाने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अशा कठीण वेळी बाबुशा यांचे पुतण्या गौरव काळोकार यांनी खासदार संजयभाऊ देशमुख यांची भेट घेऊन आर्थिक मदतीसाठी कळकळीची विनंती केली. समाजातील गरजू रुग्णांच्या मदतीसाठी नेहमीच धावून येणारे संजयभाऊ देशमुख यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वीय सहाय्यक गजानन कदम यांना पंतप्रधान सहाय्यता निधीमधून तात्काळ मदत मिळण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.खासदार देशमुख यांच्या सूचनेनुसार गजानन कदम यांनी झटपट सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सादर केला. सातत्याने पाठपुरावा करत पंतप्रधान सहाय्यता निधी कक्षाशी संपर्क ठेवला. या प्रयत्नांना यश मिळून बाबुशा तानबाजी काळोकार यांना तीन लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली.
सदर मंजुरी पत्र प्राप्त होताच बाबुशा काळोकार व त्यांच्या कुटुंबियांनी भावना अनावर होऊन अश्रूपूरित डोळ्यांनी "खासदार संजयभाऊ देशमुख हे आमच्यासाठी देवासारखेच आहेत" अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. गजानन कदम यांचेही मनःपूर्वक आभार मानले.
या प्रकारातून समाजात गरजूंना आधार देणाऱ्या लोकप्रतिनिधींचे प्रत्यक्ष उदाहरण उभे राहिले आहे. बाबुशा काळोकार यांच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला असून संपूर्ण कुटुंब आता दिलासा अनुभवत आहे.
No comments