गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी यवतमाळ प्रतिनिधी पुराणकाळापासून गुरू-शिष्याचे नाते हे पवित्र मानले गेले आहे. गुरूकडून ज्ञान घेण्याच...
गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
यवतमाळ
प्रतिनिधी
पुराणकाळापासून गुरू-शिष्याचे नाते हे पवित्र मानले गेले आहे. गुरूकडून ज्ञान घेण्याची परंपरा आजही तितकीच महत्त्वाची आहे. हे नातं जपण्यासाठी दारव्हा येथील जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था व जिव्हाळा योगा ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक विशेष कार्यक्रम आयोजित करून गुरु शिष्याचं नातं जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहायचे आणि ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली होती. गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. असाच आपल्या गुरु प्रति कृतज्ञ होण्यासाठी दारव्हा येथील जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था तसेच जिव्हाळा योगा ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो. बारा वर्षापासून आरोग्य क्षेत्रामध्ये महिलांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता निशुल्क निस्वार्थपणे योगा क्लासुरु केला त्या योग प्रशिक्षिका जिव्हाळा बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापिका सौ. माधुरी प्रवीण लोखंडे यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला तसेच गुरू शिष्याच्या नात्यावर वरिष्ठांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक वनिता लाभसेटवार, संगीता तुंडलवार, वैशाली गुल्हाने यांचा वाढदिवस हर्ष उल्हासात साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन विमल गुल्हाने, संगीता शेलोकर, रूपाली झाडे यांनी केले होते. या प्रसंगी महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन सुद्धा करण्यात आले. त्यामध्ये सीनियर सिटीजन प्रतिभाताई लाभसेटवार व अवंतीताई राऊत विजयी ठरल्याने त्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली गुल्हाने तसेच आभार प्रदर्शन पूजा जयस्वाल यांनी केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘जिव्हाळा’ संस्थेने गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान राखत समाजात आदर्श निर्माण केला आहे.
No comments