यवतमाळ प्रशासनीक ऊच्चपदस्थ सेवा करीत असतांना राष्ट्रसंताच्या विचाराने प्रभावीत होवून गूरूदेव सेवा मंडळाचे कार्य समर्पित भावन...
यवतमाळ
प्रशासनीक ऊच्चपदस्थ सेवा करीत असतांना राष्ट्रसंताच्या विचाराने प्रभावीत होवून गूरूदेव सेवा मंडळाचे कार्य समर्पित भावनेने स्विकारून,गावखेड्यात जावून राष्ट्रसंताची भजन गायन करणे,हार्मोनियम,तबला,ढोलक,बासरी ई.संगीत वादन व गायन कलेत पारंगत होवून,आपल्या कलेच्या माध्यमातून शेतक-यांच्या व्यथा बळीराजा चेतना अभियानात सामील होवून जिल्ह्यातील गावखेड्यात जावून जन जाग्रृतीचे कार्य करणे. समाजाला दिशा देणारा भजन गायक कलावंत ,किर्तनकार, पथनाट्य कलाकार ई अनेकविध संघटीत व असंघटीत कलाप्रवर्गातील कलावंत विकास प्रवाहापासून कोसो दूर व राजाश्रयापासून वंचीत राहीला असल्याचे जवळून अनूभवतांना त्यांचे आर्थीक सक्षमीकरण झालेच पाहीजे या ऊदात्त हेतूने कलावंताचे कल्याणासाठी अहोरात्र झटणारी व प्रभावी कार्य करणारी अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीमधे काम करण्याचे ठरवीले ,त्यांच्या कलेचा व्यासंग,जिल्ह्यातील कलावंतांचा संपर्क आणी कार्याची दखल घेवून त्यांना जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियूक्तीचे आदेश समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्याचे मार्गदर्शनात व विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे ह्याचे हस्ते देण्यात आले.त्यांच्या नियूक्तीचे जिल्हाभरातील कलावंतांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड,वारकरी कलावंत आघाडी प्रमूख हभप. दिगांबर गाडगे महाराज,ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,महासचीव रमेश वाघमारे,जिल्हा संघटक अशोकराव ऊम्रतकर, आणि सर्व तालूक्याचे अध्यक्ष ,पदाधिकारी तथा महीला कलावंत आघाडीचे पदाधिकारी ह्यांनी त्यांच्या यशस्वी वाटचालीच्या शूभेच्छा प्रगट केल्या आहेत.कलावंतांच्या प्रश्नासाठी संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड ह्यांचे समर्थ नेतृत्वात मन ओतून सेवाकार्य करण्याचे मनोगत व्यक्त केले.
No comments