प्रतिनिधी दारव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अद्वैत अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला स्पर्धा परीक्षा स...
प्रतिनिधी
दारव्हा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अद्वैत अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला स्पर्धा परीक्षा सराव पेपर व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा हा उपक्रम दारव्हा येथे उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
१३ जून रोजी जिजामाता कन्या शाळा, दारव्हा येथे सकाळी ११ ते १२.३० या वेळेत सराव परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आदी विषयांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले. परीक्षेत विविध गावांतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली तयारी तपासून घेतली.
या सराव परीक्षेत प्रथम क्रमांक रोशन कावळे, द्वितीय क्रमांक गौरव गाढवे, तर तृतीय क्रमांक कपिल जाधव, ईश्वर इरवे आणि रामेश्वर जाधव यांना एकत्रितरित्या प्रदान करण्यात आला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे,
व शिल्ड देण्यात आल्या.
१४ जून रोजी नवीन यवतमाळ अर्बन बँकेच्या सभागृहात बक्षीस वितरण समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजन, वेळ व्यवस्थापन व परीक्षेच्या तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन मनोज राठोड सर व अद्वैत अकॅडमीचे संचालक पवन कांबळे सर यांनी प्रभावीपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब कठाळे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष, मनसे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरज चव्हाण, नेर तालुका अध्यक्ष, मनसे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष लाला भाऊ पांडे, ईश्वर राठोड, शैलेश घाटे, राजा वांडरस्वार, जिया भाई, किरण कोडके यांच्यासह अनेक मान्यवर व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पंकज तळेगावकर यांनी केले प्रास्ताविक लाला पांडे तर आभार प्रदर्शन ईश्वर राठोड यांनी केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आत्मविश्वास स्पष्टपणे झळकत होता.या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल अद्वैत अकॅडमी व मनसे टीमचे सर्वत्र कौतुक होत असून, भविष्यात असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे
No comments