Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

घाटंजी तालुक्यातील पारवा सर्कलमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस

 पब्लिक पोस्ट  प्रतिनिधी  -रमेश मादस्तवार घाटंजी तालुक्यातील पारवा सर्कलमध्ये वादळी वाऱ्याने घाटंजी पारवा पांढरकवडा रोड बंद झाला...

 पब्लिक पोस्ट 
प्रतिनिधी 
-रमेश मादस्तवार
घाटंजी तालुक्यातील पारवा सर्कलमध्ये वादळी वाऱ्याने घाटंजी पारवा पांढरकवडा रोड बंद झाला.
 सविस्तर वृत्त असे की घाटंजी तालुक्यातील पारवा सर्कलमध्ये मंगळवार दिनांक 10/06/2025   रोजी अंदाजे पाच वाजता पारवा सर्कल मध्ये ताशी 50 तास वेगाने वारा वाहू लागला आणि विजा कडाडू लागल्या त्या सुसाटाच्या वार्या मुळे डोर्ली ते पारवा रस्त्याच्या बाजूला असलेले झाडे रोडवर येऊन पडले तसेच पांढरकवडा रोडवरील  जाम ते झुली पर्यंत डांबरी रस्ता हा जंगलातून गेलेला आहे. रोडच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सागांचे झाडे आहेत त्यामुळे दोन्ही बाजूचे झाडे हवेमुळे रोडवर कोसळून पडले रोडवर  झाडांची   हिरवी चादर अंथरल्यासारखी दिसत होते झाड पडल्यामुळे झुलीकडे वाहनांची रांग लागलेली होती तर जाब पासून पारवे कडे वाहनांची रांग लागलेली हे झाड पडल्यामुळे पूर्ण रस्ता बंद झालेला होता ते झाड साफ करायला तीन चार तास लागले त्यामुळे मोटर सायकल आणि लहान व मोठे वाहनांना वाट पाहत राहावे लागले अंदाजे आठ ते नऊ वाजता रोड पूर्ण मोकळा झाला. डोर्ली ते पारवा रस्ता बंद असल्यामुळे वाहनधारकांनी सोनखास मार्गे पारव्याला पोहोचले. हे झाड पडून रस्ता बंद  झाल्यामुळे वाहनधारकांची तारांब उडाली होती. आणि ह्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे जाब गावातील शेतकरी घरी येत असताना त्याच्या अंगावर झाड कोसळले ते झाड कोसळल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या जागीच मृत्यू झाला.

No comments