*प्रतिनिधी ! दारव्हा* गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यासोबत वाद घालून दगड मारून जखमी करून शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी दिल...
*प्रतिनिधी !
दारव्हा*
गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यासोबत वाद घालून दगड मारून जखमी करून शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार दि. ६ जून रोजी ३:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोहळा येथे घडली आहे. घटनेची अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी सूरज हनुमान सोरते वय ३६ वर्ष, रा.साने गुरुजी नगर लोहारा यवतमाळ हे (Inside Bank) बँक मध्ये बिजनेस एक्झीकेटीव्ह म्हणुन काम करीत असुन, आरोपी संतोष लोभा चव्हाण वय ४५ वर्ष, रा. कोहळा यांनी फिर्यादीचे बॅकेंतुन बोलेरो पिक-अप वाहन क्र एम एच- २९ बि.ई. ७५७२ ही गाडी फायनान्स वर घेतली असता, आरोपीने सदर गाडीचे हप्ते न भरल्याने फिर्यादी हे गाडी जप्त करण्याकरीता आरोपी कडे आले असता आरोपीने फिर्यादी सोबत वाद घालून, फिर्यादीस हातातील दगडाने डोक्यावर मारुन जखमी केले. व शशिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली आहे. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरुन आरोपी संतोष लोभा चव्हाण यांचेवर कलम ११८(१), ३५२, ३५१ (२) (३) अन्वये भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
No comments