Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

आक्रमण युवक संघटनेची यवतमाळ शहरात जल्लोषात स्थापना

यवतमाळ              यवतमाळ येथे, संस्थापक अध्यक्ष ऍड. सुनील गजभिये, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी आक्रमण संघटनेत प्...






यवतमाळ 
            यवतमाळ येथे, संस्थापक अध्यक्ष ऍड. सुनील गजभिये, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी आक्रमण संघटनेत प्रवेश केला जिल्हा अध्यक्ष म्हणून विकास मोटघरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्याम मेश्राम यांची नियुक्ती झाली.
           यावेळी यवतमाळ येथील पाटीपुरा परिसरात शेकडो युवकांनी जल्लोष सुध्दा साजरा केला, विकास मोटघरे यांनी या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की आज पर्यंत अनेक संघटनांचा अनुभव मी घेतला आहे व अनेकांना न्याय देण्यासाठी सुद्धा मी पुढे आलो सर्वच सामाजिक संघटना ह्या समाजाला न्यायच देण्याचे काम करतात आणि मी सर्वांचा समर्थक सुध्दा आहे आणि म्हणूनच एका वकील माणसाच्या नेतृत्वाखाली आक्रमण संघटना सर्व भारतभर वाढावी आणि कायदेशीर मार्गाने समाजाला न्याय मिळावा म्हणून ऍड. सुनील गजभिये यांचे खांदे मजबुत करण्यासाठी मी आक्रमण संघटना आपल्या यवतमाळ येथे स्थापन केली आहे असे त्यांनी यावेळी व्यक्त होताना मत मांडले!.
       समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल ही एकमेव भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत असे सुध्दा आक्रमण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपापले मत व्यक्त करतांना जाहीरपणे सांगितले.

No comments