ता प्र मारेगांवः- मारेगाव येथील रहिवाशी नक्षत्र प्रमोद पाटणकर या विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 99.20% ...
ता प्र मारेगांवः-
मारेगाव येथील रहिवाशी नक्षत्र प्रमोद पाटणकर या विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत 99.20% गुण मिळवून यवतमाळ जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याच्या यशाबद्दल आमदार संजय देरकर वणी विधानसभा,तसेच गट शिक्षणधिकारी काटकर सर यांनी त्याचा सत्कार केला आहे.
नक्षत्र हा मारेगांव येथील शिक्षक संगीता प्रमोद पाटणकर, यांचा मुलगा आहे. नक्षत्र याचे आई वडील शिक्षक आहे.वणी येथील स्वर्णलीला या शाळेच्या विध्यार्थी असून
त्याने मारेगांव, वणी तालुक्याचा नाही तर जिल्ह्यात सन्मान घडविला आहे. हे नेत्रदीपक यश नक्षत्रने कोणत्याही प्रकारच्या शिकवणी वर्गाशिवाय प्राप्त केले आहे. त्याला स्वयंअध्ययन करणे आवडते त्यावर त्याचा भर असतो व त्याला अभ्यासात सातत्य व पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे त्याच्या यशामागील प्रेरणास्थान आहे.
नक्षत्रच्या या यशामुळे नक्षत्रावर मारेगांव, वणी तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याच्या उज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहे कौतुक करण्यात येत आहे.
No comments