साठ वर्षानंतर विधवा महिलेला मिळणार शेती पब्लिक पोस्ट निलेश भोयर झरी जामणी : वडिलोपार्जित शेती असून सुद्धा मंदावार परिवार कडून ...
साठ वर्षानंतर विधवा महिलेला मिळणार शेती
पब्लिक पोस्ट
निलेश भोयर
झरी जामणी : वडिलोपार्जित शेती असून सुद्धा मंदावार परिवार कडून अनेक वर्षापासून शेतीला महत्त्व दिले जात नव्हते. परंतु पतीच्या मृत्यूनंतर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत बँकेत मिळणाऱ्या निधीमुळे, विधवा महिलेला माहीत पडले की आपली सुध्दा शेती आहे. तिने चौकशी केली असता तिला आपली शेती साखरा शिवारात असून ती शेती साखरा येथील एक इसम शेती करीत असल्याची माहिती मिळाली.
मुकूटबन पोलीस ठाणे अंतर्गत कायर परिसरात लक्ष्मी रामा मंदावार यांच्या सासऱ्यांची (राजन्ना मंदावार) शेती दरा साखरा जवळील कोलाम पोडाला लागून आहे. परंतु या शेतीबाबत लक्ष्मीला माहीत नव्हते. या शेतीबाबत नवरा रामा मंदावार यांनी सुध्दा शेतीबद्दल पत्नी लक्ष्मीला सांगितले नव्हते. त्यामुळे तिला शेती कुणाच्या नावाने शेती आहे हे माहीत नव्हते. परंतु पती रामा मंदावार तीन वर्षापूर्वी मरण पावल्यानंतर किसान पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत बँकेत पैसे जमा व्हायला लागले त्यामुळे त्या शेतीची भनक लक्ष्मीला लागली तिने चौकशी केली असता सातबारा वरून तिला कळले की लक्ष्मी रामा मंदावार व मुले राजु रामा मंदावार, भरत रामा मंदावार यांच्या नावाने असल्याची माहित पडले. त्याबाबत तिने ही बाब नातेवाईकांना सांगितली. त्यावरून मुकूटबन येथील नातेवाईक राजलिंगू मंदुलवार, मालुबाई मंदुलवार, शशिकला बर्लावार, संतोष बर्लावार, गंगुबाई मुद्देलवार, अशोक कुंटावार, रमेश तुमावार, राजू मंदुलवार, सुभाष दारवेलवार, पत्रकार नागेश अक्केवार, रफीक कनोजे या लोकांना घेऊन दरा साखरा येथील पोलीस पाटील कोवे मॅडम व तिचे पती पुरुषोत्तम कोवे हे सर्व साखरा येथील कोलाम पोडावर जाऊन शेती वाहिती करणारे बाबाराव मेश्राम यांचेकडे जाऊन त्यांना शेतीचे सातबारा दाखवून ही शेती मंदावार यांची आहे असे सांगितले असता शेती वाहणाऱ्या व्यक्तीने असे सांगितले की आता सध्या शेतात पीक आहे. त्यामुळे ही शेती तुम्हाला पीक निघाल्यानंतर शिमग्याला परत करतो असे आश्वासन दिले. एका विधवा महिलेला न्याय मिळवून देण्यात साखरा येथील महिला पोलीस पाटील कोवे आणि पती पुरुषोत्तम कोवे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्यामुळे सर्वांनी त्यांचे आभार मानले.
सोबत फोटो आहे.
No comments