मुडाणा बिटमधील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी ; निल पंचनामा दाखवण्याचे कारण काय ? पब्लिक पोस्ट । रजतकुमार खाडे उमरखेड / महागांव...
मुडाणा बिटमधील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी ; निल पंचनामा दाखवण्याचे कारण काय ?
पब्लिक पोस्ट ।
रजतकुमार खाडे
उमरखेड / महागांव, ता. २८ : पोलिस स्टेशनच्या हद्दिमधिल मुडाणा बिट गुन्हेगारी सोबतच अवैद्य धंद्यांचे हाॅटस्पाॅट म्हणून उदयास येत आहे. कारण मागिल बिट जमादार यांची उचलबांगडी करुन नविन बिट जमादार दिल्यानंतरही अवैद्य धंद्यांना उत आला आहे. महागांव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार धनराज निळे हे अवैद्य धंदे हद्दपार करण्याबद्दल कडक निर्णय घेत असतात व अवैद्य धंदे बंद करण्याच्या ते प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्याच राज्यातील महागांव पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या मुडाणा बिट जमादाराच्या बेजबाबदारपणे अवैद्य धंद्यांना उत आला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महागांव पोलिस स्टेशनच्या हद्दिमधिल मुडाणा बिटमध्ये नविन बिट जमादाराची नियुक्ती करुनसुद्धा अवैद्य धंद्यांनी कहर केला असून बिट जमादाराचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. काही ठिकाणी तर बिट जमादार आणि अवैद्य धंदे करणाऱ्यांचे संबंध इतके मधूर आहेत की, जणूकाही या बिट जमादारांकडून अवैद्य धंदे करणार्यांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. मुडाणा बिटमध्ये अवैद्य दारु, मटका, जुगार, गुटखा, अवैद्य प्रवासी वाहतुक तसेच कत्तलिसाठी जाणार्या गोवंशाची वाहतूक होताना दिसते. अशा प्रकारच्या अवैद्य धंद्यांची कधी तक्रार झाल्यास बिट जमादारांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. अशातच या एखाद्या अवैद्य धंद्यासंदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्याकडे अवैद्य धंद्यासंदर्भात तक्रार दिली होती परंतु बिट जमादाराकडून कार्यवाहीची पुर्वकल्पना देऊन
बिजोरा येथिल प्रतिबंधित खर्रा विक्रीला पाठबळ देऊन निल पंचनामा दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. या बिट जमादाराने आर्थिक फायद्यासाठी निल पंचनामा केल्याची चर्चा आहे. महागांव पोलिस स्टेशनमधिल ईमानदार वरीष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे पोलिस स्टेशन हद्दिंची तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैद्य धंद्यांना आळा बसू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी याकडे लक्ष देवून या बिट जमादारावर कारवाई करणे सुध्दा गरजेचे आहे.
....चौकट....
मुडाणा बिटमधील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी !
महागांव पोलिस स्टेशन हद्दीमधील सर्वच बिटमध्ये अवैद्य धंदे बंद करण्याच्या सुचना कर्तव्यदक्ष ठाणेदार धनराज निळे हे नेहमिच देत असतात. माञ त्यांच्याच पोलिस स्टेशनच्या हद्दिमधिल मुडाणा बिटमध्ये अवैद्य दारु, गुटखा, मटका धंदेवाल्यांना मुडाणा येथिल नवनियुक्त बिट जमादार पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. कर्तव्यदक्ष ठाणेदार धनराज निळे यांनी गांभीर्य लक्षात घेता, मुडाणा बिटमधिल अवैद्य धंदे बंद करावे अशी मागणी नागरीक करीत आहेत.
....चौकट....
निल पंचनामा दाखवण्याचे कारण काय ?
मुडाणा बिटमधिल बिजोरा येथे प्रतिबंधित खर्रा विक्री सुरु असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकत्याने जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्याकडे केली होती परंतु मुडाणा येथिल बिट जमादाराने तक्रारकर्ताला सुचनापञ न देता परस्पर जिल्हा पोलिस अधिक्षक यांना अहवाल पाठवला व त्यामध्ये हाॅटेल दुकानांची झडती घेऊन निल पंचनामा दाखवण्यात आला. हे विशेष.
No comments