वाशिम दि.१६: (अजय ढवळे ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी स्मशानभूमीशी निगडित अंध...
वाशिम दि.१६:
(अजय ढवळे )
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी स्मशानभूमीशी निगडित अंधश्रद्धांना मूठ माती देत आपला वाढदिवस वाशिम येथील पद्मतीर्थ मोक्षधाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत तारीख तेरा जुलै रोजी विविध सामाजिक चळवळीतील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते साजरा केला आहे. या वाढदिवसाची नियोजन महा अनिस वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले होते.
पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक गाडगेबाबांच्या रूपाने सर्वत्र पोहोचवणारे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वाशिम शाखा कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांचा नावलौकिक आहे. सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ते करीत असतात. वाईट चालीरीती, अनिष्ट प्रथा परंपरा, बुवाबाजी व अंधश्रद्धांना बळकटी देणाऱ्या कृतींच्या विरोधात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करण्याचं काम महा अनिस च्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात होत आहे.
स्मशानभूमी हे अपवित्र किंवा भीतीचे ठिकाण नसून ते देखील इतर सर्व ठिकाणांप्रमाणे सामान्य आहे. त्यामुळे स्मशानभूमीची भीती मनात बाळगणाऱ्या चुकीच्या अंधश्रद्धांना मूठ माती देत स्मशानभूमीतच आपला प्रत्येक वाढदिवस साजरा करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मधुकरराव जुमडे,आकाशवाणी चे पत्रकार सुनील कांबळे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाजुकराव भोंडणे, बाबाराव गोदमले, सुनील वैद्य, रमेश मोरे, एड.सेवेंद्र सोनोने, शाहिर दतराव वानखेडे, ग.ना.कांबळे, सिनेकलावंत अरविंद उचित, वानखेडे, युवा कार्यकर्ते जितेश कांबळे,आदींनी वाढदिवसाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंधश्रद्धा निर्मूलनार्थ चळवळींची गाणी "चला गड्यानो पाउल टाका पुढंर, उखडून टाकु अंधश्रद्धेची मुळंर" या प्रेरणादायी गिताने झाली तर दरवळतो सुगंध हा वाशिम जिल्ह्याला या शुभेच्छा पर गित बुवाबाजी विभाग प्रमुख तथा अशासकीय सदश्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अमलबजावणी समिती वाशिम चे शाहिर दतराव वानखेडे यांनी पी एस खंदारे यांच्या जिवनावर गित सादर केले, पी एस खंदारे यांचे अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच, शाळा बचाव अंदोलन असो वा ग्राम स्वच्छता मोहीम या विविध विषयांवरचे कामंगिरी हि समाजाला निश्चित दिशादर्शक व प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार काढले, रमेश मोरे, नाजुकराव भोंडणे, पत्रकार सुनील कांबळे, एड सेवेंद्र सोनोने यांनी देखील पी एस खंदारे यांच्या कामाचे कौतुक केले, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष विजय शिंदे पाटील, जिल्हा प्रधान सचिव प्रा. महेश देवळे यांनी केले
No comments