Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

सत्तेसाठी दादा मन मात्र साहेबांकडे... राष्ट्रवादी एकजूट

  विजय मालखेडे  महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाचे गुपित रहस्य बाहेर आल्याने आणि महा भूकंप झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमु...

 
विजय मालखेडे 
महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाचे गुपित रहस्य बाहेर आल्याने आणि महा भूकंप झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेमध्ये तिसरा भिडू उपमुख्यमंत्री अजित पवार आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गोची निर्माण झाली आहे एकीकडे शरद पवारांवर ती आयुष्यभर निष्ठा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत प्रसंग निर्माण झाला असून मनातून साहेबांचा आदर असला तरी सत्तेच्या मागं कामासाठी जावं लागते हे सूत्र कार्यकर्त्यांनी मनाशी बांधले असल्याने आता फक्त मतदानापुरतं तरी दादांसोबत रहावे लागेल परंतु मतदानाच्या वेळी साहेबांना साथ द्यावी लागेल अशा प्रकारचा सूर ग्रामीण विभागामध्ये दिसून येत आहे.
देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी आपली आगळीवेगळी छाप निर्माण केली आहे हे वास्तव्य नाकारता येत नाही एकेकाळी अनेक पक्षांचा सखोल अभ्यास करून सुरुवातीपासून बंडखोरीची ताकद काय आहे हे शरद पवारांनी महाराष्ट्राला आणि दिल्लीला दाखवून दिली आहे विशेषता काँग्रेसच्या हाय कमांड समोर स्वतः स्वदेशीचा नारा लावीत राष्ट्रवादीची निर्मिती केली आणि काँग्रेस पासून विभक्त होत स्वतःची अस्तित्व निर्माण करण्याची किमया महाराष्ट्रातील एकमेव असणाऱ्या शरद पवार यांनी दाखवली तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व एक देशातील प्रमुख बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचे मात्र काँग्रेसची अवस्था राज्यांमध्ये दयनीय असल्याचे दिसून येते विशेषता एकीकडे काँग्रेस ची वूड बँक हळूहळू विभाजित झाली असली तरी दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारे खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस घाई मध्ये लोटल्या गेले जरी देशातील वातावरण हे एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असले तरी राज्यातील काँग्रेसचा कमकुवतपणा हा सर्वांच्या नजरेमध्ये भरलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादीकडे विषय नजरा लागल्या होत्या आज मात्र राष्ट्रवादीचेच दोन तुकडे झाल्याने शरद पवारांसमोर मोठा पेज प्रसंग निर्माण झाला आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सोडवण्यासाठी शक्य टायगर मैदानात निघाला अशी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली आणि राज्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पवार साहेबांचे हात बळकट करायचा एक नवा समीकरणाचा पायांडप पाडण्याची तयारी कार्यकर्त्यांमध्ये लागले आहे तर दुसरीकडे प्रत्येकदा बिलांच्या भूमिकेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांवरती आरोप करून मला टार्गेट करू नका असे म्हणत शेवटी भारतीय जनता पार्टीचा हात पकडला आणि राज्याच्या समीकरणांमध्ये एक त्रिकूट निर्माण झालं तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन पक्ष एकत्र आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यांमध्ये दोन त्रिकोणांचीच लढाई कायम राहणार आहेत विशेष म्हणजे या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी ची मत अत्यंत निर्णायक ठरणार आहे जर याही वेळी वंचित बहुजन आघाडीने युती जर काँग्रेस सोबत केली नाही तर परत भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये नक्कीच येईल अशा प्रकारचा राजकीय अंदाज बांधल्या जातो आणि तो तंतोतंत खरा आहे परंतु वास्तव्यवादी असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामीण भागातील चर्चा या अत्यंत मौलिक आणि चिंतनशील असल्याचे दिसून येते जरी आम्ही सत्ता असल्यामुळे अजित दादा पवार यांच्यासोबत असलो तरी शेवटी शरद पवारांचा आदर्श आणि त्यांची मेहनत व त्यांचा आदेश आम्हाला मानावा लागेल अशी ही चर्चा दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काका पुतण्यांचे राजकीय समीकरण अनेकांना चित्रपट करणारे आहे यवतमाळ जिल्हा याला अपवाद राहणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये चालत्या गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे एकीकडे निष्ठावान म्हणून गणल्या जाणाऱ्या नाईक घराण्याने प्रथमच शरद पवारांचा हात सोडला त्यामुळे आता समीकरणाच्या अनेक फेऱ्या सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे पुसद वनी आणि यवतमाळ तिन्ही शहरांमध्ये तीन पक्षाचे वर्चस्व असल्याने आता शेवटी विजय कुणाचा हेही महत्त्वाचे राहणार आहे परंतु शरद पवार नावाचे रसायन सध्या ग्रामीण विभागांमध्ये स्वर्ग चालत असल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये एक नवा पेज प्रसंग निर्माण झालेला आहे
[15/07, 17:13] +91 94214 24242: सत्तेसाठी कार्यकर्त्यांचा आताताईपणा परंतु मन मात्र शरद पवार जवळ!

विजय मालखेडे 
सत्तेचा सारीपाट

महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्षाचे गुपित रहस्य बाहेर आल्याने आणि महाभूकंप झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेमध्ये तिसरा भिडू उपमुख्यमंत्री अजित पवार आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड गोची निर्माण झाली आहे. एकीकडे शरद पवारांवरती आयुष्यभर निष्ठा ठेवणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत पेचप्रसंग निर्माण झाला असून मनातून साहेबांचा आदर असला तरी सत्तेच्या मागे कामासाठी जावं लागते हे सूत्र कार्यकर्त्यांनी मनाशी बांधले असल्याने आता फक्त मतदानापुरतं तरी दादांसोबत रहावे लागेल,परंतु मतदानाच्या वेळी साहेबांना साथ द्यावी लागेल अशा प्रकारचा सूर ग्रामीण विभागामध्ये दिसून येत आहे.
देशाच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी आपली आगळीवेगळी छाप निर्माण केली आहे,हे वास्तव्य नाकारता येत नाही. एकेकाळी अनेक पक्षांचा सखोल अभ्यास करून सुरुवातीपासून बंडखोरीची ताकद काय आहे हे शरद पवारांनी महाराष्ट्राला आणि दिल्लीला दाखवून दिली आहे. विशेषत:काँग्रेसच्या हायकमांड समोर स्वतः स्वदेशीचा नारा लावीत राष्ट्रवादीची निर्मिती केली आणि काँग्रेस पासून विभक्त होत. स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची किमया महाराष्ट्रातील एकमेव असणाऱ्या शरद पवार यांनी दाखवली.तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचे वर्चस्व होते.एक देशातील प्रमुख बालेकिल्ला म्हणून ओळखले जायचा. आज मात्र काँग्रेसची अवस्था राज्यांमध्ये दयनीय असल्याचे दिसून येते. विशेषत:एकीकडे काँग्रेसची वोटबँक हळूहळू विभाजित झाली असली तरी दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारे खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस खाईमध्ये लोटल्या गेले. जरी देशातील वातावरण हे एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असले तरी राज्यातील काँग्रेसचा कमकुवतपणा हा सर्वांच्या नजरेमध्ये भरलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विशेष नजरा लागल्या होत्या.आज मात्र राष्ट्रवादीचेच दोन तुकडे झाल्याने शरद पवारांसमोर मोठा पेज प्रसंग निर्माण झाला आणि हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तो सोडवण्यासाठी  टायगर मैदानात निघाला अशी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली.राज्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पवार साहेबांचे हात बळकट करायचे एक नव्या समीकरणाची  तयारी कार्यकर्त्यांमध्ये येत आहे. तर दुसरीकडे प्रत्येकदा खलनायकाच्या भूमिकेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांवरती आरोप करून मला टार्गेट करू नका असे म्हणत शेवटी भारतीय जनता पार्टीचा हात पकडला.राज्याच्या समीकरणांमध्ये एक त्रिकूट निर्माण झालं तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तीन पक्ष एकत्र आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यांमध्ये दोन त्रिकोणांचीच लढाई कायम राहणार आहेत.विशेष म्हणजे या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीची मत अत्यंत निर्णायक ठरणार आहे.जर याही वेळी वंचित बहुजन आघाडीने युती जर काँग्रेस सोबत केली नाही तर परत भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये नक्कीच येईल अशा प्रकारचा राजकीय अंदाज बांधल्या जातो.तो तंतोतंत खरा आहे. परंतु वास्तव्यवादी असणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामीण भागातील चर्चा या अत्यंत मौलिक आणि चिंतनशील असल्याचे दिसून येते.जरी आम्ही सत्ता असल्यामुळे अजित दादा पवार यांच्यासोबत असलो तरी शेवटी शरद पवारांचा आदर्श आणि त्यांची मेहनत व त्यांचा आदेश आम्हाला मानावा लागेल अशी ही चर्चा दिसून येत आहे.त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काका पुतण्यांचे राजकीय समीकरण अनेकांना चितपट करणारे आहे.यवतमाळ जिल्हा याला अपवाद राहणार नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये चालत्या गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे.एकीकडे निष्ठावान म्हणून गणल्या जाणाऱ्या नाईक घराण्याने प्रथमच शरद पवारांचा हात सोडला त्यामुळे आता समीकरणाच्या अनेक फेऱ्या सध्या शहरांमध्ये दिसून येत आहे. पुसद वणी आणि यवतमाळ तिन्ही शहरांमध्ये तीन पक्षाचे वर्चस्व असल्याने आता शेवटी विजय कुणाचा हेही महत्त्वाचे राहणार आहे परंतु शरद पवार नावाचे रसायन सध्या ग्रामीण विभागांमध्ये स्वर्ग चालत असल्याने सत्ताधारी पक्षांमध्ये एक नवा पेज प्रसंग निर्माण झालेला आहे.
———————————————

No comments