अकोला शहरातील निमवाडी भागात उतरणार्या उड्डाणपूलाजवळ आज शनिवारी सकाळीच ट्रॅव्हल्सच्या बेशिस्तपणामुळे अपघात झाला असून उमरी भागात ...
अकोला
शहरातील निमवाडी भागात उतरणार्या उड्डाणपूलाजवळ आज शनिवारी सकाळीच ट्रॅव्हल्सच्या बेशिस्तपणामुळे अपघात झाला असून उमरी भागात राहणारे तलाठी नीलकंठ थोरात यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
इंदुमती ट्रॅव्हल्स कंपनीची प्रवासीगाडी क्र एम एच ०९ ई एम ७३४१ या गाडीच्या मागील भागाजवळ असलेले टूल बॉक्सचे झाकण उघडले गेल्याने सदर अपघात झाला. या घटनेनंतर खदान पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताची माहिती घेऊन इंदुमती ट्रॅव्हल्सची प्रवासीगाडी पोलिस ठाण्यात आणली. मृतक थोरात यांना उत्तरीय शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
No comments