संजय कमल अशोक देशमुख आपल्या वाड- वडिलांच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने तसेच आपल्या स्वतःच्या बळावर खऱ्या अर्थाने आयुष्यातील प्रत्...
संजय कमल अशोक देशमुख
आपल्या वाड- वडिलांच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने तसेच आपल्या स्वतःच्या बळावर खऱ्या अर्थाने आयुष्यातील प्रत्येक झुंज अगदी यशस्वी देत राज्यातील नामांकित असणाऱ्या आणि इंग्रज कालीन अशा ऐतिहासिक दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोलाच्या सचिव पदावर विरोधकांच्या चारी मुंड्या चीत करित खंबीरपणे अधिराज्य करणाऱ्या आदरणीय पवन माहेश्वरी यांचा आज वाढदिवस.
आयुष्यात लोकं खूप भेटतात पण स्मरणात फार कमी राहतात. स्मरणात राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पवन माहेश्वरी. प्रत्येकाला सन्मान देणे, थोरा मोठ्यांचा आदर करणे आणि ज्याला त्याच्या वयाप्रमाणे आदर देणे हे अंगीभूत आहे. खऱ्या अर्थाने अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे पवन माहेश्वरी. मला यांच्या बद्दल लिहिताना आज आनंद यासाठी होत आहे की, ही व्यक्ती म्हणजे स्वतःला आजकालच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास "डाऊन टू अर्थ" समजतो. कुठलाही विषय असो अगदी मित भाषेमध्ये तो बोलायचा किंबहुना कुठलाही बडेजाव आणि बाज त्यावेळी या व्यक्तीमध्ये नसतो.
शहरात रस्त्याने जाताना हा व्यक्ती ऐवढ्या मोठ्या एज्युकेशन सोसायटीचा सचिव असेल असे कोणालाही वाटत नाही किंवा त्याचा परिचय सुद्धा येत नाही. खरंतर साधा माजी नगरसेवक कसा वागतो? कुठेतरी ज्या एज्युकेशन सोसायटीचा कारभार वार्षिक फक्त दहा लाखांमध्ये खेळतो त्याचा सचिव किती मोठेपणा दाखवित मर्कट उड्या मारतो, हे आपण "सुज्ञलोक" अगदी हास्यास्पद बघत असतो. तो उथळपणा इच्छा नसताना अनुभवत असतो.
त्याचीच विपरीत बाजू म्हणजे जिथे नामांकित असणारी सर्व महाविद्यालय त्यातून घडणारी सर्व पिढी जी आज देशात आहे आणि विदेशात सुद्धा तसेच हा ऐतिहासिक वारसा खऱ्या अर्थाने जपताना प्रत्येकाच्या तोड द्यावे लागते. दुष्षप्रवृत्तीशी लढावे सुद्धा लागते आणि शांत तसेच अथांग असणारं पाणी किती खोल असते आणि कोणा कोणाला डुबवायची ताकद ठेवते, हे सुद्धा अंगी बाणवलं. सरळ लोक किती खतरनाक असतात, हे सुद्धा दाखवून देण्याची ताकद ठेवली, ती उपजतच म्हणावी लागेल.
हे करित असताना विद्यार्थी आणि आपला कर्मचारी वर्ग, प्राचार्य, प्राध्यापक सोबतच सर्व महाविद्यालयांचा परिसर हा कसा सुव्यवस्थीत असेल यासाठी अहोरात्र मेहनत घेणारी व्यक्ती या व्यक्तीनंतर शोधूनही सापडणार नाही. "खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं" म्हणण्याची धमक ज्यामध्ये असते , ती व्यक्ती आयुष्यात मिळणे फार दुरापास्त असते. पवन माहेश्वरी यांच्या मी संपर्कात आलो आणि तदनंतर खऱ्या अर्थाने स्वतःला धन्य समजतो. त्यांच्या वाटचालीमध्ये असणाऱ्या त्यांच्या संपुर्ण सुविद्य परिवाराचा, निस्वार्थ मित्र परिवाराचा आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मिळविलेल्या अद्वितीय लौकिकाचा मी मनःपूर्वक आदर करतो.
पवन गुरूजी आपल्या प्रगतीचा आलेख हा पवानाप्रमाणेच वेगवान असो , आपल्याला उदंड तथा निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. श्रीमंती आपणाकडे आहेच, ती मनाचीही आणि धनाचीही आहे. त्यामुळे माझ्या एवढ्याच तोकड्या शुभेच्छा।
आपला शुभाकांक्षी
संजय कमल अशोक देशमुख,
संपादक दैनिक पब्लिक पोस्ट अकोला आवृत्ती तथा समाजसेवक, अकोला. ७३७८३३६६९९.
No comments