Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पोलीस विभाग आता ॲक्शन मोडवर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यवाहीने यवतमाळकरांना दिलासा

 एसपीची कुख्यात गुन्हेगारांविरुध्द मोक्का, एमपीडीए व तडीपारीची धडक कारवाई पब्लिक पोस्ट  यवतमाळ राज्यातील यवतमाळ जिल्हा हा गुन्हेगारी क्षेत्र...


 एसपीची कुख्यात गुन्हेगारांविरुध्द मोक्का, एमपीडीए व तडीपारीची धडक कारवाई
पब्लिक पोस्ट 
यवतमाळ
राज्यातील यवतमाळ जिल्हा हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अव्वल क्रमांकावर जात आहेत याची खंत मनामध्ये असताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोडे यांनी आता अनेक गुन्हेगारांना घरी बसवण्याचा मनसुबा केलेला आहे विशेषता खोक्यात गुन्हेगारा विरोधामध्ये आता मोका व तडीपारची कार्यवाही केली जाणार असून याबाबत पोलीस विभागाने आता सुरुवात केली आहे
१३ मे रोजी फिर्यादी पोना राजु बबनराव गुजर वय ४१, पोस्ट अवधुतवाडी यांना पोस्टे अवधुतवाडी येथे फिर्याद दिली की, ते विजय दामोदर टोळे वय ४७ वर्षे रा. गुरुदेव नगर यवतमाळ याचा शोध घेत असतांना यातील हरविले इसमास जे. के. वाईन शॉप समोरुन अमित राजकुमार यादव, गौरव भारत उमाटे रा. दोन्ही लोहारा यांनी मोटरसायकलवर बसवुन नेल्याचे सिसिटीव्ही कॅमेराचे फुटेजमध्ये दिसल्याने त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांनी एका इसमास दिनांक १०/०५/२०२३ रोजी रात्री १०/०० वाजताचे दरम्यान जे. के. वाईन शॉप समोरुन त्याचे कडील पैसे लुटण्याकरीता त्यास मोटार सायकलवर बसवुन लोहारा परिसरात नेले व त्या ठिकाणी इतर साथीदार नामे आदित्य पाली, दिपक पुराम, व दिपक पुरामचे दोन अनोळखी मित्र यांचे मदतीने विजय टोळे यास लुटपाट करण्याचे उददेशाने नेवून त्याचे अंगावरील कपडे फाडुन त्यास नग्न करून मारहाण करुन पाण्यात बुडवून त्याचा खुन केला व त्याचे पुरावा नष्ट करण्याचे हेतुने त्याचे प्रेत अर्धवट बांधकाम इ लेल्या इमारतीच्या सेप्टीक टँकचे पाण्यात टाकुन पळुन गेलो अशी कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहीतीवरुन दारव्हा रोडवरील चेतना बाईन बारचे मागील बाजुस प्रेत तरंगत असलेले दिसुन आले. नमुद आरोपी यांनी विजय टोळे यास लुटपाट ( दरोडा टाकण्याचे) करण्याचे उददेशाने नेले व त्यास मारहाण करुन द्वार मारले असे निष्पन्न झाल्याने पोस्टे अवधुतवाडी येथे कलम ३९६, ३०२,२०१ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद

करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी अमित राजकुमार यादव वय ३३ वर्षे, रा. देवीनगर लोहारा, गौरव भारत उमाटे वय २८ वर्षे, रा. सप्तश्रुंगीनगर लोहारा, आदित्य मनोज पाली वय २० वर्षे रा. कमळेश्वर चौक लोहारा, दिपक उत्तम पुराम वय २४ वर्षे रा. देवीनगर लोहारा, अंकुश विलास रामटेके वय २१ वर्षे रा. देवीनगर लोहारा, फुलचंद सुधाकर कासार वय २१ वर्षे रा. देवीनगर लोहारा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली व गुन्हयातील मृतक हा अनुसूचित जमातीचा असल्याने गुन्हयात कलम ३ (२) (व्ही) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये कलम वाढ करण्यात आली. वन रकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हा हा संघटित गुन्हेगारी टोळीने केलेला असल्याच तासात दिसून आल्यावरुन गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अन्वये कलम वाढीची परवाणगी मिळणेबाबतचा उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग यवतमाळ यांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडुन विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परीक्षेत्र अमरावती यांचेकडे मंजुरीकरीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परीक्षेत्र यांनी दिनांक २४/०७/२०२३ रोजी मंजुरी दिली असल्याने गुन्हयात मकाका कायदयाचे कलम समाविष्ट करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी वणी हे करीत आहेत. तसेच माहे जुलै २०२३ पावेतो जिल्हयात ०५ मकोका कायदयान्वये एकुण ४० आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच जिल्हयात अवैधरीत्या गावठी हातभटटी दारु गाळुन विक्री करणारे पो.स्टे. यवतमाळ शहर हददीतील किशोर शंकर कटरे वय ५५ वर्षे रा. विश्वकर्मा नगर, पिंपळगांव, पोस्टे बाभूळगाव हद्दीतील संजय किसनराव काथोटे वय ४३ वर्षे रा. दाभा, यांचा महाराष्ट्र झोपडपटटी गुंड यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम १९८९ अन्वये स्थानबध्दतेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक यवतमाळ शहर बाभुळगांव यांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, यांचे मार्फतीने मंजुरी करीता जिल्हादंडाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी यांनी दिनांक २०/०७/२०२३ रोजी मान्यता देवून १) किशोर शंकर कटरे वय ५५ वर्षे रा. विश्वकर्मा नगर, पिंपळगांव, संजय किसनराव काथोटे वय ४३ वर्षे रा. दाभा, याचे स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले असून नमुद इसमांना यवतमाळ कारागृह येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.

पुसद शहरातील तुंडलायत कुटुंबीयाचे टोळीने परीसरात दहशत रहावी म्हणुन गुन्हे करण्याचा अभिलेख आहे. यात प्रामुख्याने टोळी प्रमुख नितिन सुरेश तुंडलायत वय ३७ वर्षे, रा. महाविर नगर पुसद व सदस्य अमर अशोक लुंडलायत वय ४० वर्षे, राजेश अशोक तुंडलायत वय ३७ वर्षे, उमेश अशोक तुंडलायत वय २२ वर्षे, २ से ४ राहणार नवलबाबा वार्ड पुसद यांचे गुन्हेगारी कृत्यांमुळे परीसरात राहणारे सामान्य नागरीकांना भय निर्माण झाले असुन त्यांनी सतत शरीराविषयक गुन्हे करण्याचे कुत्य करुन सार्वजनिक सुव्यवस्था व शांतता भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने सदर टोळीला तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुसद शहर यांनी तयार करुन पोलीस अधीक्षक, यांचेकडे मंजुरी करीता सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास हददपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक यांनी २४/०७/२०२३ रोजी मान्यता देवुन तुंडलायत टोळीतील वरीलप्रमाणे सदस्यांना यवतमाळ जिल्हयातून ०१ वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश पारीत केले.

आदेश प्राप्त होताच तुंडलायत टोळीतील टोळी प्रमुख नितिन सुरेश लुंडलायत वय ३७ वर्ष, अमर अशोक तुंडलायत वय ४० वर्षे, राजेश अशोक तुंडलायत वय ३७ वर्षे, उमेश अशोक लुंडलायत वय २२ वर्षे यांना आदेश तामील करून त्यांना यवतमाळ जिल्हयातुन ०१ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या सर्व कारवाईसाठी डॉ. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक, पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात संजय पुज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, ज्ञानेश्वर देवकते, पोलीस निरीक्षक, पोस्टे अवधुतवाडी लडकिशार पेल, पोलीस निरीक्षक, रविंद्र जेधे, पोलीस निरीक्षक, सपोनि संजय राठोड पो.स्टे. शहर, पोउपनि साहेदुधवंत, पोउपनि धनराज हाके, राजेश तिवारी, पोहवा बालाजी ठाकरे, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम घट सर्व स्थागुशा पोहवा अशोक गायकी, पोस्टे बाभुळगांव, पोना रवि नेवारे पोस्टे यवतमाळ शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

No comments