Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

मराठी चित्रपटाचे उद्या पर्यंत फलक न लागल्यास चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही - पंकज साबळे

संजय कमल अशोक देशमुख अकोला, दि.१७   दैनिक पब्लिक पोस्ट च्या वाचकांनी मीराज सिनेमा येथे मराठी चित्रपट बघितला. पण सदर चित्रपटाचे प...






संजय कमल अशोक देशमुख
अकोला, दि.१७
 दैनिक पब्लिक पोस्ट च्या वाचकांनी मीराज सिनेमा येथे मराठी चित्रपट बघितला. पण सदर चित्रपटाचे पोस्टर मात्र मिराज सिनेमाने दर्शनीय ठिकाणी लावले नव्हते. लाखो रुपयाची अकोल्यातून कमाई करून सुद्धा साधे पोस्टर लावणे मिराज सिनेमाला जमले नाही म्हणून मिराज सिनेमाच्या व्यवस्थापनाला चित्रपटाचे बोर्ड का लावले नाही ?अशी विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. 

त्यानंतर सदर सिनेमाची तक्रार प्रेक्षकांनी पब्लिक पोस्ट कडे केली. या संदर्भातील बातमी पब्लिक पोस्टने सोमवारच्या आजच्या अंकात प्रकाशित केली. सदर बातमी प्रकाशित होताच मराठी बाण्याविषयी जागृत असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तातडीने आपल्या शिलेदारांसह मिराज सिनेमा येथे पोहोचली. अकोला जिल्ह्याचे मनसेचे सेनापती पंकज साबळे यांच्या नेतृत्वात खळखट्याचा इशारा देत मिराज सिनेमा प्रशासन हादरून सोडले.
(मनसे स्टाईल आंदोलन)
बाईपण भारी देवा हा मराठी सुप्रसिद्ध चित्रपट स्थानिक मिराज सिनेमा येथे सुरु आहे . मात्र या चित्रपटाचे पोस्टर मुख्य बोर्डवर लावण्यात आलेले नाही. त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिरज सिनेमा येथे जाऊन आजच्या आज जर बाईपण भारी देवा चित्रपटाचे मोठे पोस्टर जर लावण्यात आले नाही तर उद्यापासून इतर चित्रपट सुरू राहू देणार नाही. अशी सक्त ताकीद देण्यात आली. यावर मिरज सिनेमाच्या मॅनेजरने लवकर आम्ही पोस्टर लावु असे आश्वासित केले.
या वेळी जिल्हाअध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, शहरअध्यक्ष सौरभ भगत , जिल्हा सचिव ललित यावलकर, जिल्हा सहसचिव मोहान मते, शहर उपाध्यक्ष सोनु अवचार, मुकेश दोनफोडे, राजेश पिंजरकर, शुभम कोवोकार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार, रूपेश तायडे , तालुका उपाध्यक्ष सतीश खाकरे, विभाग अध्यक्ष मंगेश देशमुख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments