अकोला प्रतिनिधी तीन आरोपी गजाआड ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अकोला :- अवैधरित्या पिस्तुल व तलवारीची शहरात विक्री करणाऱ्या टोळी...
अकोला
प्रतिनिधी
तीन आरोपी गजाआड ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अकोला :- अवैधरित्या पिस्तुल व तलवारीची शहरात विक्री करणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. पोलीसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून कारवाई दरम्यान पोलिसांनी एक गावठी बनावटीची पिस्तूल, एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर, ७ राउंड (बंदुकीचा गोळया) दोन धारदार लोखंडी तलवार असा एकुण १ लाख ,१३ हजार ५०० रुपयांचा जप्त केला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिसांन संभु राजपुत रा. खोलश्वर अकोला हा शहरात येणार असून त्याच्याजवळ बेकायदेशीर पणे अग्नीशस्त्र ( पिस्तुल ) व तलवार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने दोन अग्निशस्त्र एक पिस्तूल व रिव्हाल्वर तसेच दोन लोखंडी धारदार तलवार हरी झाडे रा. गौरक्षण रोड अकोला व आकाश आसोलकर रा.उमरी अकोला यांना विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी संगु राजपुत रा. खोलश्वर अकोला, हरी झाडे रा. गौरक्षण रोड अकोला व आकाश आसोलकर रा.उमरी अकोला यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूध्द सिव्हिल लाईन व खदान पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट नुसार करण्यात आली आहे.या संदर्भात पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, पोलीस कर्मचारी दशरथ बोरकर. राजपाल ठाकुर, गणेश पांडे, पोहवा. फिरोज खान, गोकुळ चव्हाण, भास्कर धोत्रे नापोका खुशाल नेमाडे, पो.कॉ. आकाश मानकर, अभिषेक पाठक, धिरज वानखेडे, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, पो. कॉ. अन्सार शेख, पो. कॉ. स्वप्नील खेडकर यांनी केली आहे.
No comments