Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

गोर बंजारा महिलांचा पहिला मेळावा आणि कर्तृत्वान महिलांचा सन्मान

 अकोला  महानगरात गोर बंजारा महिलांच्या सन्मानार्थ गोरसिकवाडी सामाजिक महिला कर्मचारी आणि राष्ट्रीय संयोजक विलास रामावत यांच्या वत...


 अकोला 
महानगरात गोर बंजारा महिलांच्या सन्मानार्थ गोरसिकवाडी सामाजिक महिला कर्मचारी आणि राष्ट्रीय संयोजक विलास रामावत यांच्या वतीने पहिला मेळावा आयोजित करून समाजातील कर्तृत्ववान महिला व विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी हार तुऱ्यांना फाटा देत वृक्षांची रोपे देऊन हरितक्रांतीचा संदेश देण्यात आला.

हरितक्रांतीचे प्रणेता माजी मुख्यमंत्री वसंतराव नायक यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त महानगरात बंजारा संस्कृती वारसा जपण्यासाठी आणि महिला जनजागृती व सक्षमीकरण, बंजारा समाजातील तांड्यातील शैक्षणिक ,सांस्कृतिक आर्थिक, राजकीय क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात सक्षम होऊन महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आरदास म्हणून भोग देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी गोर महिलांनी आरक्षण, संस्कृती-धर्म, बंजारा साहित्य, आर्थिक परिस्तिथी, राजकारण अश्या विविध विषयांवर डॉ सुनिती राठोड, डॉ ललिता चव्हाण, डॉ संगीता पवार, डॉ सुजाता चव्हाण, वर्षा राठोड (API), सौ रोहिणी राठोड, सौ सरिता पवार, प्रा सुरेखा चव्हाण, प्रा शारदा राठोड, डॉ वैशालीताई, प्रा छाया राठोड, प्रा जया चव्हाण, डॉ सुरेखा जाधव, लताबायी राठोड यांनी आपले विचार, मांडले. बंजारा समाजातील कर्तृत्वान महिलांचा आणि शिक्षणात घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींचा सन्मान वृक्षांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वृक्षसंवर्धनासाठी हरितक्रांतीचा संदेशही देण्यात आला. तर श्रेया विलास राठोड, प्रगती कमलसिंग जाधव, शरयू सुनिल चव्हाण, श्रुती विलास राठोड, करिष्मा रोहिदास चव्हाण, सृष्टी रामराव राठोड यांचा नीट व जेईई मध्ये यश संपादन केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. प्रतीक्षा बापूराव चव्हाण (सॉफ्टवेअर डेव्हलपर}सपना प्रभू चव्हाण, रीना रमेश चव्हाण यांचा सेट परीक्षेत यश मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. विशेष कार्य म्हणून निकिता राठोड, प्रियंका कुंदन जाधव, संजना चव्हाण, मनीषा राठोड, प्रियंका राठोड, निकिता जाधव यांचा सन्मान करण्यात आला. बंजारा समाजातील नसलेल्या 5 वर्षाच्या तन्वी ढोकने या चिमुकलीने बंजारा भाषेत आपले विचार मांडून सुंदर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय संयोजक विलास रामावत, डॉ सुभाष राठोड, प्रा. विशाल जाधव, सुभाष रामावत, सरदार राठोड, आत्माराम जाधव, देवकर सर, प्रा. डी. के. राठोड, गोविंद जाधव, गोविंद राठोड, प्रकाश राठोड आदींनी परिश्रम घेतले.

No comments