Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पीसीएलच्या दोन विद्यार्थिनीने मारली शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी

दाभा (सुमेध कावळे)  पीसीएल हायस्कूल दाभा येथील वर्ग आठ मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन कर...


दाभा
(सुमेध कावळे) 
पीसीएल हायस्कूल दाभा येथील वर्ग आठ मध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करून पीसीएल हायस्कूलच्या शिरपेचाच मानाचा तुरा रोवला आहे.
या विद्यालयातील कु. श्रुती पराते व नंदिनी खराबे या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केले. 
विशेषत: पीसीएल हायस्कूलच्या शालांत माध्यमिक परीक्षेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांकाने सुद्धा याच शाळेतील विद्यार्थिनीने उत्तीर्ण होऊन गौरवशाली इतिहास निर्माण केला होता. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्रा. वसंत परोपटे ,मुख्याध्यापक महेंद्र प्रताप सिंह ठाकुर ,पर्यवेक्षक चंद्रकांत हुड तथा सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण विभागातील मुली असल्याने परिसरामध्ये कौतुक व्यक्त केल्या जात आहे.

No comments