नारायण थुल विशेष प्रतिनिधी दि बुद्धिस्ट पेन्शनर सोशियल असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नागभुमी वडगाव य...
नारायण थुल
विशेष प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट पेन्शनर सोशियल असोसिएशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था नागभुमी वडगाव यवतमाळ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावी मध्ये 80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व्हि.पी. पाटील शिक्षणाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता या कार्यक्रमाचेउद्घाटन नरेंद्र फुलझेले अप्पर जिल्हाधिकारी वर्धा आपल्या भाषणात मुलांना उद्देशून म्हणाले की मुलांनो मोठे व्हायचे असेल तर मोठे स्वप्न बघा थोर पुरुषांचे ग्रंथ वाचन करा चिंतन आणि मनन करा अधिकारी बनायचे असेल जीवनात उंच भरारी घ्यायची असेल तर खूप परिश्रम करावे लागेलअसे उदगार त्यांनी काढले.
दहावी आणि बारावी हे वर्ष जीवनात परिवर्तन करणारे वर्ष आहे तेव्हा तुम्हाला कठोर परिश्रम केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही आम्ही लहान असताना असे मार्गदर्शन मिळत नव्हते तुम्ही भाग्यवान आहात याचा फायदा. तुम्ही करून घ्यायला पाहिजे असे भावनिक उद्गगर नरेंद्रजी फुले यांनी काढले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ अनिरुद्ध रायबोले डी वाय एस पी प्रदीप गोडे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यवतमाळ शैलेंद्र मोटघरे लेखा अधिकारी यवतमाळ नामदेवराव थूल कास्ट्रइब संघटनेचे विभागीय अध्यक्ष तसेच नितेश मेश्राम डायरेक्टर करिअर सक्सेस पॉईंट अकादमी यवतमाळ या सर्वांनी गुणवंत मुलांना प्रमाणपत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या सर्वांनी मुलांना मार्गदर्शन केले नितेश मेश्राम यांनी दहावी नंतर काय कोणत्या क्षेत्रात जायचे यासंदर्भात मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशनचे अध्यक्ष नारायण थूल सचिव जनार्धन मनवर उपाध्यक्ष ल.पू .कांबळे मधुकर वाघमारे कोषाध्यक्ष अनंत कांबळे सदस्य भोजराज भगत धनंजय नंदेश्वर अशोक निमसरकर प्रकाश वंजारे आनंद टिपले माया बोरकर निळकंठ भगत दीपक मनव र सुनिता भवरे गुलाब रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष. नारायण थूल यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक अंकुश वाकडे आणि आभार धनराज नंदेश्वर यांनी मानले.
No comments