Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

पीसीएल हायस्कूल दाभ्याची तनुश्री भोयर बाभूळगाव तालुक्यात प्रथम

बाभूळगाव ( प्रतिनिधी)शिक्षक विकास मंडळ दाभा द्वारा संचालित पीसीएल हायस्कूल दाभा व कला,एच.एस.व्ही.सी.कनिष्ठ महाविद्यालय दाभा,ता-ब...




बाभूळगाव
(प्रतिनिधी)शिक्षक विकास मंडळ दाभा द्वारा संचालित पीसीएल हायस्कूल दाभा व कला,एच.एस.व्ही.सी.कनिष्ठ महाविद्यालय दाभा,ता-बाभूळगाव
जिल्हा-यवतमाळ येथील एस.एस.सी.बोर्डाचा निकाल (92.85%) टक्के लागला आहे.ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमानंतर 72 वर्षाच्या यशाची परंपरा कायम ठेवून पीसीएल हायस्कूल दाभा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 
या शाळेची विद्यार्थिनी तनुश्री भोयर हीने बाभुळगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. परीक्षेला एकूण 42 विदयार्थी प्रविष्ठ झाले पैकी 39 विदयार्थी उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झाले आहे, यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शाळा या परिसरात उभी करण्यात आली असून या शाळेमुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच गरीब कष्टकरी कस्तकारांची मुले इथे शिक्षण घेतात,ही शाळा 1951 वर्षांपासून निःशुक्ल शिक्षण देत आहे.
2023 या वर्षाच्या निकाल मध्ये शाळेतून 
प्रथम- कु.तनुश्री भोयर (96.20%)
द्वितीय-कु.अंजली भगत(91.40%)
तृतीय- वृषभ शेवतकर (91.00%) तसेच समीक्षा गणेशकर(89.40),विनय भगत(89.80),अली साकीब(85.60),रिया जयस्वाल(88.00),तनुजा काथोटे(81.80) इत्यादी विध्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.
वरील  विध्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रा वसंत परोपटे, अध्यक्ष डॉ आनंद हजारे,तथा पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर,, पर्यवेक्षक चंद्रकांत हूड,,जेष्ठ शिक्षिका बन्सोड मॅडम, जेष्ठ शिक्षिका मंगला सुलताने,चंद्रशेखर लोखंडे,पवन बन, गजानन उघडे,भारती फाळके, अंकुश वाकडे,लक्ष्मीकांत परोपटे, घनश्याम परोपटे  यांनी घरी जाऊन पुष्पगुच्छ व मिठाई देऊन मुलांचे कौतुक केले.

No comments