पांढरकवडा(सागर मुळे) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, महिलांचा, अवार्ड्स ऑफ इंट...
पांढरकवडा(सागर मुळे)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या, महिलांचा, अवार्ड्स ऑफ इंटरनॅशनल, वुमन्स वर्ल्ड रिवार्ड, या पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील मौजे उमरी रोड तालुका पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्त्या कुमारी कांता साधू सुतार यांना दिव्यांग, अनाथ निराधार, शेतकरी व समाजातील वंचित घटकांना, न्याय मिळवून देणे तसेच शासकीय सुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी, उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल, सन्मान देऊन, गौरव करण्यात आला.
यवतमाळ जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये, आपल्या कामाच्या माध्यमातून, प्रशासकीय व निमशासकीय, क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा, ठसा उंटवून लोकांना न्याय मिळवून देणे, तसेच आदिवासी विभागातील, दिव्यांग बांधवांना सर्व सुविधा मिळवून देणे तसेच दिव्यांग प्रमाणपत्र, शासकीय सर्व सुविधा मिळवून देणे, अशा विशेष कार्यामुळे, त्यांना या अगोदर, राजीव गांधी फाउंडेशन दिल्ली, यांच्यातर्फे ही त्यांना पुरस्कार देऊन, त्यांचा सन्मान केलेला आहे.
त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही कुमारी कांता सुतार, यांचे अभिनंदन, करण्यात येत आहे. आपल्या स्वतःच्या घरामध्ये तीन दिव्यांग असताना ही, आपल्या प्रमाणे समाजात वंचित असणाऱ्या इतरांना कसा न्याय मिळवून देता येईल, यासाठी त्यांची धडपड, आणि कामाची विशेष पावती समाजातील विविध संघटना संस्था घेत आहेत. त्यामुळे त्यांना पुढील कार्य करण्यासाठी एक चांगला आधार व आत्मविश्वास निर्माण होऊन आजच्या पद्धतीने अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून न्याय व सुविधा दिल्या आहेत.
No comments