यवतमाळ (प्रतिनिधी) यवतमाळ येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्ही.पी. पाटील यांच्या लेखणीतून निर्माण झालेले बुद्धाची उजेडवाट या ग्...
यवतमाळ
(प्रतिनिधी)
यवतमाळ येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व्ही.पी. पाटील यांच्या लेखणीतून निर्माण झालेले बुद्धाची उजेडवाट या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा २० मे ला सायंकाळी 7 वाजता झुलेलाल प्राइड दारव्हा रोड यवतमाळ येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोक पळवेकर ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य महिला महाविद्यालय चांदुर रेल्वे जिल्हा.अमरावती हे असून त्यांच्याच हस्ते प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळ येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सागर जाधव तथा विख्यात चित्रकार बळी खैरे व प्रसिद्ध कवी हेमंत कुमार कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते निलंबर लोखंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
लेखक विठ्ठल पांडुरंग पाटील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी असून दि बुद्धिस्ट पेन्शनर्स सोशियल असोसिएशन यवतमाळ येथील माजी अध्यक्ष आहेत. त्यांना 2023 चा साहित्य सांस्कृतिक अकादमी पुणे व इंटरनॅशनल लिटरेचर अँड कल्चरल अकॅडमी दिल्ली द्वारा सम्यकत्व राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून प्रसिद्ध कवी म्हणून सुद्धा ते नावलौकिक झाले आहे. या ऐतिहासिक ग्रंथामध्ये भगवान बुद्ध आणि बुद्ध मूर्ती, बुद्धाची चारिका म्हणजे पौर्णिमेच्या उजेडाचे उधान, बुद्ध धम्म अडीचहजार वर्ष का टिकला, यशोधरा एक आदरणीय स्त्री, बुद्धाची उजेडवाट, वेगवेगळ्या युगातील उजेड शोधणाऱ्या स्त्रिया, मनुस्मृति कालीन स्त्रियांची स्थिती, आणि उत्थान वाटेतील स्त्रिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विविध विषयांवर सखोल मंथन आणि लेखन करण्यात आलेले आहे. या प्रकाशन सोहळ्याला यवतमाळ अमरावती तथा विदर्भातील नामांकित साहित्यिकांची उपस्थिती सुद्धा राहणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन पाटील यांनी केले आहे.
No comments