Page Nav

HIDE
Thursday, July 10

Pages

Classic Header

Top Ad

Breaking

गडकरींच्या नावाने आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या आर्णीच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

आर्णी (श्याम जगताप) प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर ...



आर्णी
(श्याम जगताप)
प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यामध्ये एकमेकांवरच्या आरोपाच्या फेरी सध्या महाराष्ट्रामध्ये परिचित झालेले आहेत यावेळी काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धनगेकर यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती पोस्टचा पाऊस पाडला. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील एका इसमाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षपार्य मजकूर व्हाट्सअप ग्रुपवर टाकल्याने सायबर गुन्ह्या अंतर्गत त्याचेवरती गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. महाराष्ट्रातील पुण्याच्या कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी घोषित करण्यात आले. या निकालामध्ये 28 वर्षानंतर कसबा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या हातून काँग्रेसने हिसकावून घेतला, त्यामुळे समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पोस्ट करण्याचा सपाटा लावल्या जात आहे. यापैकीच एका संदेशांमध्ये सदर व्यक्तीने नितीन गडकरी यांच्या नावाने अक्षपार्य वक्तव्य लिहून ते एका व्हाट्सअप ग्रुपवर पाठवले हा संदेश सर्वीकडे वायरल झाल्यानंतर आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खाजगी सचिव यांनी सायबर पोलिसांकडे फोनवरून तक्रार नोंदविली. त्याबाबतची माहिती आयुक्तांना सुद्धा कळवली आहे. काल सायंकाळी स्वतः खाजगी सचिवांनी पोलीस आयुक्तालय गाठून तक्रार दिल्याने सदर व्यक्तीचा शोध लावला असता तो यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असल्याचे तपासांती निदर्शनास आले असून सदर व्यक्तीच्या शोधासाठी पथक आता आर्मीकडे रवाना झाले आहे. या तक्रारीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याबाबत सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी हे ठिकाण आता बहुचर्चित झाल्याची माहिती हाती आली आहे.

No comments