नेरपरसोपंत प्रतिनिधी करुणा बुद्ध विहार समिती शिरजगाव पांढरी नेर, यवतमाळ येथे १४ व १५ फेब्रुवारी, २०२३ ला होणाऱ्या चैत्य स्तुपाच...
नेरपरसोपंत
प्रतिनिधी
करुणा बुद्ध विहार समिती शिरजगाव पांढरी नेर, यवतमाळ येथे १४ व १५ फेब्रुवारी,
२०२३ ला होणाऱ्या चैत्य स्तुपाचे नव निर्माण बांधकाम व पूज्य भन्ते धम्मानंदजी महास्थवीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार होते. परंतु शिरजगाव पांढरी येथील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच, माजी जि.प. सदस्य, संजय गांधी निराधार योजना नेर तालुका अध्यक्ष, जीवन विकास शिक्षण संस्था कोव्हळा अध्यक्ष सदाशिवराव गावंडे यांचे ऐन उमेदीच्या काळात हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. महत्वाचे म्हणजे १५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. पण अचानकपने काळाच्या पडद्याआड गेलेत. त्यामुळे केवळ शिरजगाव पांढरीच नव्हे तर संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. त्यांच्या दुःखात करुणा बुद्ध विहार समिती सहभागी आहे. सदाशिवराव गावंडे हे करुणा बुद्ध विहार तथा विश्वस्त समिती यांच्याशी निगडीत असून ते तन मन धनाने आमच्या हाकेला ओ देणारे होते. आपण कार्यक्रम घेतल्याने याचा सर्व समाजापर्यंत विपरीत संदेश जावू नये. व समाज मन दुखावल्या जावून दुभंगु नये म्हणून 'करुणा बुद्ध विहार समिती" चे अध्यक्ष ,सचिव व सर्व विश्वस्त सदस्य गण यांच्या सर्वानुमते हा नव निर्मित चैत्य स्तूपाचे व पुज्य भन्ते धम्मानंदजी महास्थवीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
१४ फेब्रु. २०२३ रोजी फक्त पुज्य भन्ते धम्मानंदजी महास्थवीर यांना भावपूर्ण मुक श्रद्धांजली देवून
सदरहू सर्व कार्यक्रमास पूर्णविराम देण्याचे सर्वानुमते ठरले आहे. त्यामुळे आम्ही करुणा बुद्ध विहार समिती चे सर्व विश्वस्त, बौद्ध उपासक उपासिका पुज्य भन्ते धम्मानंदजी
महास्थवीर यांच्यावर अपार व असिम श्रद्धा असणारे उपासक यांच्या सदभावनेचा आदर करून उदार अंतकरणाने दिलगिरी व्यक्त करतो आहोत. आपल्या सर्व श्रद्धाळू उपासक , उपासिका व सर्व जनतेच्या सदभावनेचा अनादर होवू नये असे आवाहन समितीने केले आहे.
या नव निर्मित चैत्य स्तूपाचे व पुज्य भदन्त धम्मानंदजी महास्थवीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण
सोहळा येत्या काही दिवसातच मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल. आणि त्याची तारिख ठरल्यानंतर ती आपल्या
पर्यंत पोहचविण्यात येईल.
No comments