Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

गाडगे बाबांची दशसूत्री घराघरापर्यंत पोहोचवा! अनुष्का मेहेत्रे

दाभा (प्रतिनिधी) एकाही वर्गात न जाता लोकप्रबोधनाची चळवळ संपूर्ण जगाला समजून सांगणारे लोकसंत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेच्य...


दाभा
(प्रतिनिधी)
एकाही वर्गात न जाता लोकप्रबोधनाची चळवळ संपूर्ण जगाला समजून सांगणारे लोकसंत गाडगेबाबा यांनी महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. 
या ऐतिहासिक कामगिरीच्या माध्यमातूनच पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी दशसूत्री देऊन जनजागृती केल्याचे एकमेव उदाहरण आहे.  परिवर्तनशील समाज व्यवस्थेमध्ये ही दशशत्री जर तंतोतंत लागू केली तर येणारी पिढी हे निश्चितच आकाशामध्ये भरारी घेईल. लोकसंत गाडगेबाबांचे कीर्तन हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते, त्याचे तंतोतंत पालन आज समाजामध्ये होणे अत्यंत गरजेचे असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने गाडगेबाबांच्या दशशत्रीचे आचरण करायला पाहिजे असे प्रतिपादन बाल विचारवंत अनुष्का मेहत्रे यांनी लोकसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पीसीएल हायस्कूल दाभा येथे केले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिन्मय लोखंडे हे होते, तर प्रमुख अतिथी गौरी कुबडे, श्वेता गिरसपुंजे व ईशान प्रशांत लोखंडे यांची उपस्थिती होत. सर्वप्रथम लोकसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्ह्यारपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृदुला नंदकिशोर खवले यांनी केले तर गाडगेबाबा यांच्या जीवनावरती विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला यावेळी यज्ञा धावडे, वैदैवी कुऱ्हाडे यांनी विचार मांडलेत. सोबतच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मंगला सुलताने यांनी आपले विचार व्यक्त करताना गाडगेबाबांचे विचार जीवनामध्ये अनुकरणशील असून सामाजिक दृष्टिकोनातून ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. 
त्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ हळूहळू संपूर्ण भारतामध्ये सक्रिय होत चाललेली असून अंधश्रद्धा, स्वच्छता आणि लोकप्रबोधन या तत्त्वावर यांनी आपलं आयुष्य समर्पित केले  असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर शाळेचे पर्यवेक्षक चंद्रकांत हूड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गाडगेबाबांच्या जीवनावरती प्रकाश टाकला.
 अध्यक्षीय मार्गदर्शन चिन्मय लोखंडे यांनी केले त्यावेळी ते म्हणाले, अंधश्रद्धेवरती प्रखर टीका करणाऱ्या लोकसंताने तुम्हा आम्हा सर्वांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेकदा विविध मार्गाने प्रबोधन केले आहे त्याचा वारसा आपण जोपासायला पाहिजे. यावेळी कार्यक्रमाची सांगता समारोपाने करण्यात आली. अनुष्का गणेशकर हिने लोकसंत गाडगेबाबा यांच्या प्रार्थनेनंतर सर्वांचे आभार मानले. यावेळी बाल कलाकार व विद्यार्थ्यांनी लोकसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र ठाकूर, गजानन उघडे, चंद्रशेखर लोखंडे,भारती फाळके, विशाखा तलवारे, पवन बन, लक्ष्मीकांत परोपटे, सागर नावडे इत्यादींची उपस्थिती होती.

No comments