दिल्ली इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी ऑनलाइन डिजिटल होत आहेत. विशेषता कुठलीही बाब सहज करणे तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून अगदी सोपी...
दिल्ली
इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टी ऑनलाइन डिजिटल होत आहेत. विशेषता कुठलीही बाब सहज करणे तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून अगदी सोपी झाली असून त्यापासून निवडणुका कशा दूर राहतील. निवडणुकांचे निकालही दूर राहू शकत नाही. भारतासह अनेक देशात निवडणुका फिरवल्याचा आरोप विरोधक करीत असतानाच अशाच परिस्थितीमध्ये आज एका कंपनीने जगातील 33 देशांचा निवडणूक निकालामध्ये हॅकिंग सोशल मीडियावर स्वयंचलित व अपप्रचार करून निकाल फिरवल्याचे धक्कादायक तंत्र उघडकीस आले असून त्यामुळे आता भारतामध्ये सुद्धा याची विविध क्षेत्रांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायल मधील ही कंपनी 50 वर्षीय टाल हनान या इजरायली लष्करातील माजी अधिकाऱ्याची असून त्यासाठी त्यांनी आपले नाव जॉर्ज असे ठेवले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकापासून तो निवडणूक निकाल फिरविण्याचे कार्य करीत असून त्याची टीम आता विविध क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. आफ्रिकेतील एका निवडणुकीचा निकाल फिरवण्याच्या मागे लागली असून दुसरा तो आता ग्रीस आणि अमिरात मध्ये सुद्धा हा प्रयोग करणार आहे. त्यामुळे हळूहळू आता आफ्रिका आणि युरोप खंडामधून हे लोन आशिया खंडामध्ये तर येणार नाही ना अशी भीती निर्माण झाली असून सामाजिक माध्यमांमध्ये त्याची उघड उघड चर्चा सुरू झाली आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये असे उघड झाले आहे की ही टीम जॉर्जद्वारे चुकीची माहिती शस्त्र म्हणून कशी वापरली जाते त्याचा कुणालाही पत्ता लागत नाही त्यामुळे या निवडणुकीत गुप्तपणे हस्तक्षेप करण्याचा वापर सुद्धा केला जात असून हा गुप्त कार्पोरेट क्लाइंट साठी ही काम करीत असल्याची धक्कादायक माहिती सांगितली आहे.हनानने दिलेल्या पत्रकारांना माहितीनुसार त्यांच्या या सेवांना ब्लॅक असे म्हटले जात असून जनमत वाढवण्यासाठी इच्छा असलेल्या गुप्तचर संस्था राजकीय मोहिमा आणि खाजगी कंपन्यांसाठी त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यांची सेवा सध्या आफ्रिका खंड दक्षिण आणि मध्य अमेरिका युरोपमध्ये सुद्धा सर्रास वापरल्या गेल्याचा दावा सुद्धा तपासामध्ये केल्या गेल्यातून यानंतरही बऱ्याच गोष्टी समोर येणार आहे.जी मेल आणि टेलिग्राम खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हॅकिंग तंत्राचा वापर करून प्रतिस्पर्ध्यांची माहिती जमवली जाते त्या आधारे सोशल माध्यमाने अपप्रचार करणाऱ्या बातम्या पसरल्या जातात आणि सॉफ्टवेअर च्या मदतीने वायरल केल्या जातात. त्यामुळे सुद्धा ही मोठा आव्हान आता जगामध्ये निर्माण झालेला आहे आशिया खंडामध्ये असणाऱ्या चीन आणि भारत या देशांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान वापरले जर गेले तर इथल्या लोकशाहीची अवस्था काय होईल हे सांगता येत नाही.
टीम जॉर्जच्या प्रमुख सेवांपैकी एक म्हणजे अत्याधुनिक सॉफ्टवेअर पॅकेज एम्स हे ट्विटर लिक्डन फेसबुक टेलीग्राम जी ग्राम इंस्टाग्राम युट्युब ने हजारो बनावट सोशल मीडियाचे प्रोफाइल नियंत्रित करू शकते त्यातील काही प्रोफाइल कडे क्रेडिट कार्ड बिटकॉइन वाटलेस आणि इयर बी एन बी खाते देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
No comments