Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

अवैध रित्या तांदूळ घेवून जाणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

मनोहर बोभाटे    राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ विभागाच्या वतीने दिं १ फेब्रुवारी...

मनोहर बोभाटे 
 राळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ विभागाच्या वतीने दिं १ फेब्रुवारी २०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असताना राळेगाव येथे सापळा रचून हरी ओम नगर येथून गोपाल नगर मार्गे अवैधरित्या १९ टन तांदूळ घेऊन जात असलेला ट्रक जप्त केला आहे. 
अवैध रित्या तांदळाचा ट्रक हा गोपालनगर मार्गे जात असताना रोडवरील अन्वी गॅस गोडाऊन समोरून ८ वाजून ४५  मिनिटांनी सदर ट्रक थांबवून ट्रक मधील असलेल्या मालाची विचारणा केली त्यांनी तांदूळ असल्याचे सांगीतले असून ट्रक मधील असलेल्या मालाची पाहणी केली असता पांढऱ्या  व पिवळ्या रंगाच्या पोत्यात  तांदूळ भरलेला ट्रक दिसला ट्रक क्रमांक एम एच ४० बी एल ५३१४ या क्रमांकाच्या ट्रक मधून तांदळाचे अवैध्य वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली त्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे व पथकातील सुनील खंडागळे, सुधीर पिदूरकर, नरेश राऊत  स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकाने वसीम हरून मोहम्मद वय ३२ वर्षे राहणार इंदिरा गांधी वार्ड हिंगणघाट व तूफेल जमील शेख वय पंचवीस वर्ष राहणार इंदिरानगर नवीन वस्ती राळेगाव यांना तब्येत घेतले त्यांना ट्रक मध्ये असलेल्या मालाबाबत विचारणा केली  असता त्यांच्याकडे  खरेदीचे कोणते बिल किंवा कागदपत्रे आढळून आले नाही त्यामुळे याबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करता तो ट्रक व त्यामधील तांदूळ असा मुद्देमाल राळेगाव पोलीसच्या स्वाधीन करण्यात आला आहे व पुढील कारवाई  तहसीलदार राळेगाव व पुरवठा विभाग राळेगाव करीत आहे.

No comments