मनोहर बोभाटे ( राळेगाव बनणार ब्लॅक डायमंड सिटी ) राळेगाव तालुक्यातील सोनुर्ली येथे विहिरीचे खोदकाम करीत असताना भावरावजी म...
राळेगाव तालुक्यातील सोनुर्ली येथे विहिरीचे खोदकाम करीत असताना भावरावजी मेश्राम यांच्या शेतात आज रोजी दगडी कोळसा आढळल्याचे दिसून येत आहे ही माहिती मिळताच सर्व स्तरावरून विहिरीकडे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे तसेच या घटनेची माहिती मिळताच राळेगाव महसूल विभाग यांनी प्रत्यक्ष दर्शनी जाऊन तेथील तलाठी यांनी तिथे पंचनामा केलेला आहे.
आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मत विचारनात घेतले असता माहिती मिळाली की, काळा दगडी कोळसा असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे तालुक्यात संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे,परंतु अवघ्या बारा ते पंधरा फुटावर कोळसा दिसून येत असल्याने तेथील सुपीक जमीन ही संपूर्ण तालुक्यात असून जवळपास खाली दगडी कोळसा असल्याचे असे जनसामान्यात चर्चा दिसून येत आहे, यावर महसूल विभाग आपले कार्य बजावत असल्याचे दिसून येत आहे,जनतेमध्ये खूप मोठा संभ्रमाचा विषय असल्याने प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनतेचा संभ्रम दूर व्हावा याकरिता महसूल विभाग कार्यरत व तत्पर असल्याचे आज रोजी दिसून येत आहे.
No comments