Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

गोवंश तस्करीत वाढ,पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

*    झरी जामणी (निलेश भोयर) पोलीसांच्या मिलीभगतमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यातून वणी मुकुटबनमार्गे मार्ग बदलून गायी व...

*

 
 झरी जामणी
(निलेश भोयर)
पोलीसांच्या मिलीभगतमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्‍यातून वणी मुकुटबनमार्गे मार्ग बदलून गायी व गुरांची मोठी खेप रात्रंदिवस थेट तेलंगणा राज्यात पाठवली जात असल्याची बाब संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असूनही अनभिज्ञ होत आहे.
गोवंश गुरांवर बंदी असतानाही रात्रंदिवस खुलेआम मार्ग बदलवून वरोरा, वणी, कायर मार्गे टुंड्रा येथे वाहनांद्वारे गुरांची खेप महाराष्ट्रातून थेट तेलंगणा राज्यात नेली जात आहे. वरोरा शहरातून पिक-अप वाहनात गुरे भरून वणी, कायर मार्गक्रमण करीत कायर वरून सरळ पुरड मार्गे किंवा आड मार्गाने टुंड्रा येथे वाहनाने आणली जातात. त्यांनतर टुंड्रामध्ये गोवंशाचे वाहने रिकामे करून टुंड्रा येथून पाच ते दहा जनावरांचा कळप करून रात्रीच्या वेळी पायदळ मार्गक्रमण करीत मुकूटबन पोलीस ठाण्यासमोरून मांगली मार्गे मांगलीचे रेल्वे फाटक ओलांडल्यानंतर मांगली गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या मांगली घाटात नेली जाते. रात्रीच्या वेळी पैनगंगा नदीच्या पलीकडे गुरांना पायी नेले जात असल्याची बाब समोर आली असून रात्रीच्या अंधारात हा सगळा खेळ सुरू असल्याचे ऐकायला मिळत आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
रात्रीच्या गस्तीदरम्यान मुकुटबन पोलिसांना हे दृश्य दिसत नाही का, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे. मिलीभगतमुळे पोलिस कर्मचारी गस्तीकडे दुर्लक्ष करतात. अनेकवेळा गस्तीची कर्तव्ये केवळ कागदावर दाखवली तरी गस्त केली जात नाही. याचा थेट फायदा गाय तस्कर पोलिसांच्या संगनमताने घेताना दिसतात. हा गोरख धंदा बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

No comments