प्रतिनिधी झरी (निलेश भोयर) राजीव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पाटण येथे वणी विधानसभेचे माजी आमदार श्री. कासावार साहेबांच्या ...
प्रतिनिधी झरी
(निलेश भोयर)
राजीव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, पाटण येथे वणी विधानसभेचे माजी आमदार श्री. कासावार साहेबांच्या वाढदिसानिमित्त आश्रमशाळा, पाटण येथे तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, यात दिनांक:-24 ला वामनराव कासावार याच्या स्नेहसंमेलनाचे थाटात उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी आश्रमशाळेने आदिवासी लोकनृत्य आविष्काराणे जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी अमृत महोत्सवी 75 वा वाढदिवस अतीशय थाटात , आनंद उत्सवात साजरा करण्यात आला, तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या प्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पैनगंगा एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष प्रविणभाऊ कासावार तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राजीव कासावार , तर स्वंस्थेच्या सचिव श्रीलताताई कासावार तथा सदस्य सूर्यतेज कासावार उपस्थित होते. तर श्रुती कासावार यांच्या मार्मिक मनोगताने प्रमुख पाहुन्यांची मने जिंकली.
या प्रसंगी श्रुती ने आदिवासी विकास विभागातील शाळा बाबत आपले मत व्यक्त करतांना आपल्या विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वतोपरी कटिबध्द आहोत असेही मनोगतात नमूद केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रविनभाऊ कासावार यांनी साहेबांना शुभेच्या देवून,आदिवासी आश्रमशाळा पाटण येथील आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला शुभेच्या दिल्या,तथा आश्रमशाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करून शाळेतील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सूचोवात दिलें , तथा या वार्षिक स्नेहसंमेलचे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आविष्काराचे कौतुक करण्यात आले.
या वार्षिक स्नेहसंमेलना प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक मुख्याध्यापक.सतिश दासपतवार यांनी केले तर सूत्र संचालन श्री. प्रमोद केलेगुंदी, तथा विशाल खोले यांनी केले. आभारप्रदर्शन प्राथमिक मुख्याध्यापक अतुल गणोरकर यांनी केले .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे गजानन चंदावार , कु. शुभांगी लीहितकर, राहुल, मानकर, राकेश परसावार, कु. नीलम गेडाम, प्रकाश खिरडकर, सुहास डहाके, प्रकाश निकम, अधीक्षक अजय भुत्तमवार, अधिक्षिका कु. मयुरी ठेंगणे, उमेश बलकी, महेश कासावार, कु. मोनिका बोंनगिरवार, सौ. वैशाली तोटेवार, गजानन गिज्जेवार, अशोक गोदुरवार, सचिन भादिकर, प्रशांत मुके, जमीर शेख, गजानन भिंगेवार, विलास मेश्राम, गजानन संकपागवार, प्रविण गावंडे आदींनी अतीशय नियोजन पुर्वक कार्यक्रमासाठी व यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले..
No comments