Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

यवतमाळच्या अंगद इंगळेकरला दोन सिल्वर, दोन गोल्ड

  प्रतिनिधी यवतमाळ पुणे येथे सुरु असलेल्या मीनी ऑलम्पीक स्पर्धेत यवतमाळच्या अंगद विलीन इंगळेकर याने ट्रायथलॉन तसेच मॉडर्न पेन्टा...

 
प्रतिनिधी यवतमाळ
पुणे येथे सुरु असलेल्या मीनी ऑलम्पीक स्पर्धेत यवतमाळच्या अंगद विलीन इंगळेकर याने ट्रायथलॉन तसेच मॉडर्न पेन्टाथलॉन मध्ये दोन सिल्वर तसेच दोन गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याच्या यशामुळे यवतमाळात क्रिडापटूंनी  जल्लोष केला आहे.  

     यवतमाळ येथील अंगद इंगळेकर हा क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य च्या अंतर्गत पुणे येथे क्रिडा प्रबोधीनी मध्ये शिक्षण घेत आहे. प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्ययावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्याच्या दृष्टीने व क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने सदर क्रिडा प्रबोधीनी चालविल्या जात आहे. याठिकाणी जलतरण, सायकलींग, अॅथलेटीक्स यासह विविध खेळांचे अंगद तंत्रशुध्द प्रशिक्षण घेत आहे. पुणे येथे सुरु असलेल्या मिनी ऑलम्पीक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती. यामध्ये अंगद इंगळेकरने ट्रायथलॉन वैयक्तीक मध्ये गोल्ड, ट्रायथलॉन रीले मध्ये गोल्ड, मॉडर्न पेन्टाथलॉन वैयक्तीक मध्ये सिल्वर तसेच मॉडर्न पेन्टाथलॉन डबल्स इव्हेन्ट्स मध्ये सिल्वर असे चार पदके प्राप्त केली आहे. पेन्टाथलॉन इव्हेन्ट मध्ये अनघ वानखेडे हा त्याचा सहखेळाडू होता. ट्रायथलॉन रीले मध्ये अनघ वानखेडे, स्नेहल जोशी, संजना जोशी हे अंगद चे सहखेळाडू होते. विशेष म्हणजे या सहखेळाडू मधील जोशी बघीनी या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. तो आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक बालाजी केन्द्रे, सावंत सर क्रिडा प्रबोधीनी पुणे यांना देतो. त्याच्या या निवडीबद्दल यवतमाळ येथील इंदुताई इंगळेकर, विलीन इंगळेकर, वैशाली इंगळेकर, डॉ. गीरीष माने, राजु जॉन, एसडीओ शैलेश काळे, आरडीसी ललीत व-हाडे, क्रिडा भारतीचे शैलेष देशमुख यांनी तसेच क्युरीअस स्पोर्ट्स क्लब च्या खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे.  


1 comment